Maharashtra Weather Update: राज्यातील अनेक भागात हुडहुडी भरली आहे. अनेक शहरांमध्ये पारा घसरला असून थंडीत मोठी वाढ झाली आहे. अनेक शहरांमध्ये किमान तापमानात घट होऊन ते एका अंकावरती आले आहे. मुंबई, पुण्यातही थंडीने जोर पकडला आहे. मुंबईत यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे, याआधी काही दिवसांपूर्वीच तापमान 16.8 अंशावर घसरलं होतं. (Maharashtra Weather Update)


मुंबईत आज 16.5 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यातही तापमान 9.5 अंश सेल्सिअस इतकं निचांकी नोंदवलं गेलं आहे. महाबळेश्वरपेक्षाही अहमदनगर थंडीने गारठलं आहे, शहराचा किमान पारा घसरला आहे. अहमदनगरमध्ये पारा घसरला असून, तापमान 8.3 अंश सेल्सिअसवर घसरला आहे. जेऊरमध्ये किमान तापमान 6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलं आहे. (Maharashtra Weather Update) संभाजीनगर आणि नाशिकमध्ये 10.6 अंश सेल्सिअस तर महाबळेश्वरमध्ये किमान तापमान 10.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. यंदा कडाक्याची थंडी पुण्यात जाणवू लागली आहे. वर्षीतील हे पहिलेच एक अंकी किमान तापमान नोंदवले गेले आहे. 




समुद्र किनाऱ्यांजवळील शहरांमध्ये देखील तापमान घटले आहे, रत्नागिरीत तापमान 17.3 अंशांवर पोहोचले आहे. मालेगाव 12.6, उदगीर 11.2, सांगली 12.7, कुलाबा 21.4, माथेरान 14 अंश सेल्सिअस, नांदेड 11.3, कोल्हापूर 15, सोलापूर 12.8 बारामती 9.5, परभणी 10, हवेली 8.4 इतकं नोंदवलं गेलं आहे. (Maharashtra Weather Update)


मुंबईतील तापमान मागील 10 वर्षातलं दुसरं सर्वात कमी


मुंबईतील तापमान मागील 10 वर्षातलं दुसरं सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलं आहे. याआधी 2016 साली 16.3 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली होती. पुढील काही दिवसांमध्ये तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. नाशिक, अहिल्यानगर, पुण्यात थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने (IMD) यलो अलर्ट दिला आहे. (Maharashtra Weather Update)


परभणीचे तापमान 8 अंशावर-जिल्हा थंडीने गारठला


परभणीचे तापमान 8 अंशावर-जिल्हा थंडीने गारठला आहे. यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. परभणी शहरासह जिल्हाभरात मागच्या 2 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून आज यंदाच्या मौसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.आज जिल्ह्याचे तापमान हे  8 अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले आहे. वाढेलल्या थंडीमुळे नागरिक उबदार कपड्यांचा वापर करताना दिसत आहेत. शिवाय शहरासह ग्रामीण भागात शेकोट्या पेटायलाही सुरुवात झाली आहे. महत्वाचे म्हणजे ही थंडी हरभरा,गहू पिकांसाठी फायदेशीर आहे.