Maharashtra Weather Update: राज्यात उत्तरेकडील वाऱ्यामुळे चांगलाच गारठा वाढायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा सुरु झाली असून अनेक भागात किमान तापमानात घसरण झाली आहे. येत्या काही दिवसात थंडीचा जोर आणखी वाढणार असून तापमान 1 ते 3 अंशांनी खाली जाण्याची शक्यताा आहे. (IMD forecast)


दरम्यान, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात 10 अंशांच्या खाली तापमान जात असल्याच्या नोंदी होतायत. शनिवारी यवतमाळ जिल्ह्यात 7.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर, सांगली, पुण्यातील हवेली, तसेच गोंदिया आणि नगर जिल्ह्यात किमान तापमान 8 अंशांवर गेल्याची नोंद झाली. इतर भागात साधारण 10 ते 12  अंशांची नोंद झाली.


हवामान विभागाचा अंदाज काय?


पश्चिमी चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात काही भागात हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या राज्यांमध्ये हलका पाऊस आणि हिमवृष्टी होत आहे. यातच उत्तरेतील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला असून कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय झाले आहे. हे कोरडे वारे राज्याच्या दिशेनेही वाहत असून आकाश निरभ्र आणि स्वच्छ सुर्यप्रकाश आहे. त्यामुळे सकाळी गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. (Weather Update)


शनिवारी दिवसभरात कमाल तापमानाचा पारा कमालीचा वाढलेला होता. मुंबईतील सांता्क्रूझ भागात कमाल तापमानात 35 अंशांची नोंद झाली.  तर पुण्यातही काही भागांमध्ये 33 अंशांपर्यंत कमाल तापमान गेलं होतं. सोलापूरात 35.5 अंश तर राज्यात बहुतांश भागात तापमानाचा पारा 30 अंशांच्या पुढेच असल्याची नोंद करण्यात आली.


येत्या 3 दिवसांत कसं राहणार तापमान?


 मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी तापमानाचा पारा घटनाचे चित्र आहे. अनेक भागांमध्ये 10 अंशाच्या खाली तापमान गेलंय. राज्यातील कमाल तापमानही 2 ते 3 अंशांनी घसरणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या 4 ते 5 दिवसात हळूहळू दोन ते तीन अंशांनी कमाल तापमान हे घसरणार आहे. तर किमान तापमान पुढील 3 दिवसात दोन ते तीन अंशांनी घसरेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.गेल्या आठवड्यात किमान तापमानाचा पारा 15 ते 20 अंशावर गेला असल्यानं नागरिक उकाड्याने आणि घामाच्या धारांनी हैराण झाले होते. आता पुन्हा एकदा थंडीला पोषक वातावरण तयार झालंय. येत्या दोन ते तीन दिवसात हळूहळू तापमान कमी होणार असून गारठा वाढण्याची शक्यता आहे. 


हेही वाचा:


Maharashtra Weather Update: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह कोकणात येत्या 3 दिवसात तापमानाचा पारा कसा राहणार? हवामान विभागानं सांगितलं..