Maharashtra Weather Update: गेल्या दोन आठवड्यांपासून गायब झालेली थंडी पुन्हा जाणवू लागली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी तापमानाचा पारा घटनाचे चित्र आहे. अनेक भागांमध्ये 10 अंशाच्या खाली तापमान गेलंय. राज्यातील कमाल तापमानही 2 ते 3 अंशांनी घसरणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या 4 ते 5 दिवसात हळूहळू दोन ते तीन अंशांनी कमाल तापमान हे घसरणार आहे. तर किमान तापमान पुढील 3 दिवसात दोन ते तीन अंशांनी घसरेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. पुढील 48 तास किमान तापमानात फारसा बदल होणार नसल्याचं हवामान विभागाने सांगितलंय. (IMD Forecast)

Continues below advertisement


राज्यातील काही भागात सकाळच्या सुमारास थंडीचा कडाका जाणवतोय. गेल्या आठवड्यात किमान तापमानाचा पारा 15 ते 20 अंशावर गेला असल्यानं नागरिक उकाड्याने आणि घामाच्या धारांनी हैराण झाले होते. आता पुन्हा एकदा थंडीला पोषक वातावरण तयार झालंय. येत्या दोन ते तीन दिवसात हळूहळू तापमान कमी होणार असून गारठा वाढण्याची शक्यता आहे. (Weather Update)


हवामान विभागाचा अंदाज काय? 


हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या अफगाणिस्तन आणि आजूबाजूच्या परिसरात सक्रिय आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी असलेल्या उत्तरेतील राज्यांमध्ये विस्तीर्ण भागात पावसासह बर्फ वृष्टी होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होणार असून राज्यातील थंडीचा कडाका काहीसा वाढणार आहे. किमान तापमानात येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने आधी आर्द्रता आणि  कमाल तापमान वाढल्याने नागरिकांना उकाडा सहन करावा लागला.  आता पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागणार असून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये कोरडे वारे सक्रिय झाले आहेत. किमान तापमान दोन ते तीन अंशांनी घट झाल्याच दिसत आहे. अनेक भागात सकाळच्या सुमारास धुक्याची चादर पसरली असून थंडीपासून वाचण्यासाठी पुन्हा एकदा शेकोट्या पेटू लागल्यात.


उत्तरेत थंडीचा प्रभाव वाहतूकीवर!


देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे शेकडो उड्डाणे आणि रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी दाट धुक्यामुळे 202 उड्डाणे उशीर झाली. दिल्ली आणि आग्राहून निघणाऱ्या अनेक गाड्या उशिराने सुरू झाल्या.दाट धुक्याचा परिणाम 14 राज्यांवर होत आहे. पंजाबमधील अमृतसर येथील विमानतळ शून्य दृश्यमानतेमुळे बंद करण्यात आले. येथे विमानसेवा बंद करण्यात आली आहे. याशिवाय, दृश्यमानता आणि बर्फवृष्टीमुळे श्रीनगर, जम्मू-काश्मीरमध्ये उड्डाण सेवाही बंद करण्यात आली आहे.


हेही वाचा:


Weather Update : दिल्लीत दाट धुक्यांमुळे तब्बल 202 उड्डाणे उशीराने, श्रीनगर आणि अमृतसर विमानतळ बंद; हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे तापमान उणे 14 अंशांवर