Maharashtra weather : राज्यातील बौहुतंश जिल्ह्यात पावसाला (Rain) सुरुवात झालीय. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, आज राज्यात वातावरण (Weather) नेमकं कसं असेल? याबाबतची माहिती हवामान विभागन दिली आहे. आजही राज्याच्या विविध भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


हवामान विभागन दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रावर अंशतः ढगाळ आकाश राहील. दक्षिण कोकण आणि गोव्याच्या काही भागांवर ढगांचा पट्टा पसरलेला आहे. या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. सोलापूरमध्येही ढगाळ वातावरण असून, अधूनमधून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच रायगडमध्ये आजपासुन पुढील चार दिवस जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. 


पंजाबराव डख यांचा अंदाज काय?


दरम्यान, पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आज राज्याच्या विविध भागात पाऊस पडणार आहे. राज्यात 14 जून पर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. परंतू, या कालावधीत सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूरधाराशिव, पंढरपूर या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. म्हणजेच राज्यातील दक्षिणेकडील भागांमध्ये चांगला पाऊस पडणार अशी शक्यता पंजाबराव डखांनी व्यक्त केली आहे. उर्वरित राज्यात मात्र खूप मोठा पाऊस पडणार नाही. तसेच 15 ते 16 जून दरम्यान पावसाची विश्रांती पाहायला मिळू शकते, अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. 


यंदा राज्यात लवकरच चांगल्या पावसाला सुरुवात


दरवर्षीपेक्षा यंदा राज्यात लवकर चांगल्या पावसाला (Maharashtra Rain) सुरुवात झाली आहे. जून महिन्यात मान्सून जरी महाराष्ट्रात दाखल झाला तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस राज्यात पडत नाही. सर्रास जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्यातच राज्यात चांगला पाऊस होत असतो. यावेळी मात्र, जून महिन्याच्या सुरुवातीलाच जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. तर काही भागात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे. तर काही भागात शेती पिकांना देखील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं फटका बसला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


सोलापुरात आठ दिवसापासून मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत, अनेकांच्या घरात पाणी