Maharashtra weather News : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, काही भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (imd) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.


या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचरोली आणि वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं याभागात आज जोरदार पावसाची शक्यता आहे. 


जळगाव जिल्ह्या पावसाचा शेती पिकांना फटका, ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी


जळगाव जिल्ह्यात गेल्या महिना भरापासून संततधार पाऊस सुरु असल्याने अनेक शेत शिवारात पाणी साचून राहिल्याने पीक खराब होत असल्याचं बघायला मिळत आहे. त्याचबरोबर नुकत्याच काढनीवर आलेल्या उडीद मूग पिकाच्या शेंगामधील दान्याना कोंब फुटल्याने शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याचं दिसत आहे. त्यामुळं आता सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून, शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.


धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ


राज्यात सध्या घाटमाथ्यासह बहुतांश ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावलीय. मुसळधार पावसानं ओढे, नाले, झरे ओसंडून वाहतायत. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून धरणसाठ्यातही वाढ होताना दिसतेय. राज्यातील अनेक धरणे आता फुल्ल झाली आहेत, तर काही धरणांमध्ये वेगवेगळ्या धरणांच्या विसर्गाने, पावसाने वाढ होतानाचे चित्र आहे. मागील काही दिवसांच्या पावसाने अनेक नद्यांना पूरसदृश्य स्थिती आली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील लघू, मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये 75.09 टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 11.85 टक्के अधिक पाणीसाठा झालाय. 


महत्वाच्या बातम्या:


Maharashtra Dam water Update: राज्यात मुसळधार पावसानं कोणती धरणं फुल्ल, कुठे सुरु विसर्ग? विभागनिहाय परिस्थिती अशी....