Jalgaon Crime News : हॉटेलमध्ये जेवत असताना सराईत गुन्हेगाराच्या (criminal) बंदुकीतून (Gun) गोळी सुटल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये (Jalgaon) घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नसले तरी मोठा आवाज झाल्याने खळबळ उडाली आहे. जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शालिमार हॉटेलमध्ये पोलिसांमध्ये हाणामारी झाल्याची क्लिप सोशल मीडियावर वायरल  झाल्याची कालची घटना ताजी असतानाच, आज त्याच हॉटेलमध्ये एका सराईत गुन्हेगार आपल्या मित्रांसोबत जेवत असताना त्याच्या जवळ असलेल्या बेकायदेशीर बंदुकीतून जमिनीवर गोळी मारुन मित्रांना दाखवली.


दरम्यान, यावेळी गोळीबार केल्याचा मोठा आवाज झाल्याने त्याच्या सोबतचे मित्र आणि तो देखील पसार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. तसेच या घटनेचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. या घटनेत कोणी जखमी झाले नसले तरी ,एका हॉटेलमध्ये सराईत गुन्हेगाराकडून करण्यात आलेल्या गोळीबार  घटनेने ,अशा गुन्हेगारांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांच्या पुढे आहे.


महत्वाच्या बातम्या:


Sangli Crime News: ठाकरे गटाच्या नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न, रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने तो थोडक्यात वाचला, घटनेनंतर हल्लेखोर पसार