Vidarbha Weather Update : राज्यातील अनेक भागात मोसमी पावसाने (Maharashtra Monsoon) दमदार हजेरी लावली असताना, विदर्भवासी (Vidarbha) अजूनह आकाशाकडे डोळे लावून आहेत. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील काही भागात कोसळलेल्या पावसाने एकच दाणादाण उडवली आहे. यात अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तर अनेकांच्या नाहक बळीही गेला आहे. मात्र अलिकडे पडत असलेला पाऊस हा मान्सून (Monsoon) नसल्याचे नागपूर हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
अशातच उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांसह बळीराजालाही आता दमदार पावसाची प्रतीक्षा असतानाच विदर्भातील जलसाठयाने तळ गाठल्याचे चित्र आहे. त्यामुळे जवळ जवळ अर्धा जून महिना निघून गेल्याने मृग नक्षत्र कोरडे तर जाणार नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पूर्व विदर्भातील अनेक तलावांनी गाठला तळ
जून हा पावसाचा महिना. मात्र, आता जून महिन्याचा मध्यान्ह लागला असला तरी भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भात पाहिजे त्या प्रमाणात मान्सूनचं अजूनही आगमन झालेलं नाही. परिणामी प्रखर उष्णता आणि उन्हाच्या झळा अजूनही नागरिकांना सोसाव्या लागत आहे. अशाच तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील अनेक तलाव कोरडे ठाक झाले आहेत. तर, काही तलावांची पाण्याच्या पातळीनं अगदी तळ गाठला आहे.
नागपूर विभागातील प्रकल्पातील जलसाठा
नागपूर विभागाचा जलसाठा आजची स्थिती 37 टक्के आहे. मात्र मागील वर्षी हाच जलसाठा 41.52 इतका होता
जिल्हा आणि प्रकल्पातील जलसाठा
बावनथडी : आजचा साठा 6.41,
मागील वर्षीचा आजच्या दिवशीच साठा 22.55
गोसेखुर्द : आजचा साठा 32.61
मागील वर्षी 28.40
अस्वलामेंढा : आजचा साठा 21.67, मागील वर्षी 70.19
दिना : आजचा साठा 18.76, मागील वर्षी 33.97
धापेवाडा : आजचा साठा- 51.78, मागील वर्षी 37.28
इटियाडोह : आजचा साठा 24.68, मागील वर्षी-24.68
कालीसरार : आजचा साठा 0 टक्के, मागील वर्षी 34.74
पुजारी टोला : आजचा साठा 36.60, मागील वर्षी 86.06
शिरपूर : आजचा साठा 8.59, मागील वर्षी 9.15
- नागपुर
कामठी (खैरी) : आजचा साठा 85.78, मागील वर्षी 70.40
खिंडसी : आजचा साठा 58.42, मागील वर्षी - 66.68
नांद : आजचा साठा 0.51, मागील वर्षी- 17.63
तोतलाडोह : आजचा साठा 49.79, मागील वर्षी-57.75
वडेगाव : आजचा साठा 29.27, मागील वर्षी-32.91
- वर्धा
बोर : आजचा साठा 29.86, मागील वर्षी 35.91
लोअर वर्धा : आजचा साठा 48.47, मागील वर्षी - 49.59
इतर महत्वाच्या बातम्या