Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठं थंडी तर कुठं ढगाळ वातावरण जाणावत आहेत. तर काही भागात पावसाची (Rain) शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे मंगळवार दिनांक 10 जानेवारी पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळलेले वातावरण राहणार आहे. तर तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ गडगडाटीसह अवकाळी पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. 


विशेषतः खान्देश आणि लगतच्या नाशिक नगर छत्रपती संभादीनगर तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर  जिल्ह्यात मंगळवारी 9 जानेवारीला पावसाची शक्यता अधिक असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. तसेच पश्चिम मध्य प्रदेश उपविभागाबरोबरच महाराष्ट्रातील लगतच्या खान्देशातील  शिरपूर शहादा चोपडा यावल रावेर तालुक्याच्या तुरळक भागात तुरळक ठिकाणी किरकोळ गारपीटीची शक्यताही नाकारता येत नसल्याचे माणिकराव खुळे म्हणाले.


महाराष्ट्रात पुन्हा थंडीची शक्यता


दरम्यान, ढगाळ आणि पावसाळी वातावरण ओसंरल्यानंतर म्हणजे गुरुवार दिनांक 11 जानेवारी, अमावस्येपासून, उत्तर भारतातून उत्तर आणि ईशान्य दिशेकडून थंड कोरडे वारे घुसण्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रात पुन्हा थंडीची शक्यता जाणवत असल्याचे  माणिकराव खुळे म्हणाले.  दरम्यान, 6  ते 10 जानेवारी पर्यंतच्या 5 दिवसात  महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे 16 डिग्री से.ग्रेड(म्हणजे सरासरीपेक्षा 4 डिग्रीने अधिक)  व दुपारचे कमाल तापमान 28 डिग्री से. ग्रेड(म्हणजे सरासरीइतके) दरम्यानचे असण्याची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.  


देशातील काही राज्यात पावसाची शक्यता 


भारतीय हवामान विभागाने (IMD) पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये पुढील 2 दिवसांत सौम्य थंडीची लाट राहणार आहे. तर पुढील 2 दिवसांत उत्तर-पश्चिम भारतात दाट ते दाट धुके कायम राहण्याची आणि त्यानंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. तर पुढील 5 दिवसांत मध्य प्रदेशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच आज विदर्भासह  छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर 8 आणि 9 जानेवारी रोजी पश्चिम हिमालयीन प्रदेशात काही ठिकाणी हलका्या पावसाची शक्यता आहे. तर वायव्य भारताच्या मैदानी भागात हलका पाऊस पडेल.


महत्त्वाच्या बातम्या:


पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? 'या' राज्यात पावसाची शक्यता