पुणे: राज्यात मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान असल्याने आज कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. उत्तर कोकणात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा 'ऑरेंज अलर्ट' (Heavy Rain) हवामान विभागाने दिला आहे. 'विफा' चक्रीवादळाचे अवशेष असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरात आज कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ईशान्य अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात, उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या किनारा आणि बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. रायगडसह संपूर्ण कोकणाला आजपासून दोन दिवस पावसाचा रेड अलर्ट जारी, तर मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.(Heavy Rain) 

Continues below advertisement


कोकण किनारपट्टीवर पुढील 24 तास अतिमुसळधार पावसाचा इशारा


राज्यात पुढील काही दिवसांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर पुढील 24 तास अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर येथे मुसळधार पाऊस तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या तीन जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागांमध्ये देखील अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही तास मुंबई आणि कोकणातील जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असणार आहेत.


राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट


रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाटमाथा  ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.


रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट आहे. पण सध्या मात्र पावसाला विश्रांती घेतलीय. बुधवारी दुपारनंतर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला. अर्थात कोसळणारा पाऊस हा सरींवर बरसात होता. मध्यरात्री देखील काही मुसळधार सरी बरसल्या. पण त्यानंतर मात्र पावसाने उघडीत घेतली आहे. जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात किंवा दऱ्या खोऱ्यांमध्ये असलेल्या भागांमध्ये पावसाचा जोर तुलनेने जास्त आहे. पावसानं सध्या उसंत घेतली असली तरी वातावरण मात्र पावसाला पूरक आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आजचा दिवस हा मुसळधार पावसाचा असणार आहे.


सावधानतेचा इशारा


मुसळधार पाऊस (रेड अलर्ट) : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.
जोरदार पाऊस (ऑरेंज अलर्ट) : मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाटमाथा.
मध्यम ते जोरदार पाऊस (यलो अलर्ट) : कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
विजांसह पाऊस (यलो अलर्ट) : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर.