State Water Crisis:  राज्यातील पाणीसंकट (Water Crisis) अधिक गडद झालं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील (Marathwada)  पाणीसाठ्यात मोठी घट झालीय. तर उत्तर महाराष्ट्रातही (North Maharashta) पाण्याची पातळी घटली असून धरणांमधील पाणीसाठा कमी झालाय. तर कोकण आणि विदर्भातील परिस्थिती तुलनेने बरी आहे. तर राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची स्थितीही चिंताजनक आहे. मागील वर्षी अपेक्षित पाऊस झाला नसल्याने मराठवाड्यात (Marathwada) देखील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याची टंचाई आणि दुष्काळाच्या झळा यामुळे बळीराजा मात्र हतबल झालाय. 


राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्नही तितकाच गंभीर बनला आहे. हंडाभर पाण्यासाठी अनवाणी पावलांनी दाहीदिशा वणवण करण्याची वेळ महिलांवर आली आहे. उजनी धरणात शून्य टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी याचवेळी 18 टक्के जलसाठा शिल्लक होता. कोयना धरणात 42 टक्के खडकवासला धरणात 55 टक्के पाणीसाठा आहे. लातूर, धाराशिव आणि बीडमधील  धरणांमधील परिस्थिती भीषण आहे. जायकवाडीतील धरणसाठा 16 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मागील वर्षी याचवेळी जायकवाडीत  52  टक्के पाणीसाठा होता.


मराठवाड्यात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता


मराठवाड्यात गत वर्षी 42 टक्क्यांवर असलेला पाणीसाठा यंदा मात्र फक्त 16 टक्क्यांवर आली आहे. उत्तर महाराष्ट्रात मागील वर्षी याचदिवशी 50 टक्क्यांवर असलेला धरणसाठा यंदा मात्र 25 टक्क्यावर आली आहे.  पश्चिम महाराष्ट्रातील पाणीसाठा 31 टक्क्यांवर, मागच्या वर्षी धरणांमध्ये जवळपास 39 टक्के जलसाठा होता. कोकण आणि विदर्भातील परिस्थिती तुलनेनं बरी आहे. कोकणात गतवर्षी  49  टक्के पाणीसाठा शिल्लक होता, यंदा धरणांमध्ये 47  टक्के पाणीसाठा  आहे.   पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात 47  टक्के पाणीसाठा, मागील वर्षी याचवेळी 49 टक्के पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक होता. नागपूर विभागात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा 44 टक्के धरणांमध्ये जलसाठा होता.  मागील वर्षी 28 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता .


उजनीत शून्य टक्के पाणीसाठा


उजनीत शून्य टक्के पाणीसाठा, मागील वर्षी याचवेळी 18 टक्के जलसाठा शिल्लक होता.  कोयना धरणात 42 टक्के जलसाठा शिल्लक होता.   पुण्यातील खडकवासला धरणात 55  टक्के पाणीसाठा  होता. लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यामधील धरणांमधील परिस्थिती भीषण परिस्थिती होती. जायकवाडीतील धरणसाठा 16  टक्क्यांपर्यंत खाली आला, मागील वर्षी याचवेळी जायकवाडीत 52  टक्के पाणीसाठा होता.  मराठवाड्यात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. 


हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण 


छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवते आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना दीड ते दोन किमी पर्यंत पायपीट करावी लागतेय. जीवघेणी कसरत करत खोल विहिरीतून पाणी भरावं लागतंय. लहान मुलं, वृद्ध महिलाही जीवावर उधार होवून पाण्यासाठी जीवघेणी कसरत करतायत. एरवी पाण्याचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयगावात यंदा मात्र दुष्काळाची स्थिती निर्माण झालीये. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचा हा मतदारसंघ आहे.. मात्र कुणालाच या पाणीसंकटाकडे लक्ष द्यायला वेळ नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय.