मुंबई : जागावाटपातच नाही तर विजयातही शिवसेना सेंच्युरी मारणार असा विश्वास शिवसेना उद्धव  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut)  व्यक्त केला. तर  संध्याकाळपर्यंत ठाकरे गटाची पहिली यादी येणार आहे. जागावाटप 99 टक्के पूर्ण झाले असून घोषणेची केवळ औपचारिकता असे देखील  संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.


जागावाटपाविषयी बोलताना  संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये मोठा संसार आहे. 99 टक्के  जागावाटपाचा काम  पूर्ण झाले आहे.  आम्हाला सरकार बनवायचं आहे. उद्याचे आम्ही सत्ताधारी आहोत, त्यामुळे तोलून मापून आम्ही जागा वाटप करत आहोत . आज संध्याकाळपर्यत पत्रकार परिषद घेणार आहे. तीन पक्षाचे प्रमुख या परिषदला उपस्थिती राहतील.  शिवसेनेला जागा वाटपत सेंच्युरी मारावी अशी अपेक्षा आहे. सोबतच तेवढेच निवडून येऊ अशी आशा आहे.


 शिवसेना कोणत्याही प्रकारची सौदेबाजी करत नाही : संजय राऊत


वरळीच्या जनतेने आदित्य ठाकरे यांच काम पाहिल आहे . शिवसेना कोणत्याही प्रकारची सौदेबाजी करत नाही.  नांदगाव मतदार संघ हा ठाकरे गटाकडेच राहील. आम्ही कोणत्याही प्रकारची सौदेबाजी करत नाही . इथल्या हुकुमशाहीला मी विरोध केला म्हणून मला अटक झाली , असेही संजय राऊत म्हणाले. 


शिवसेना ही या मैदानातली अनुभवी खेळाडू : संजय राऊत


शिवसेना ही या मैदानातली अनुभवी खेळाडू आहे.  याच्यामुळे शिवसेनेला सेंच्युरी मारावीच लागेल.  फक्त सेंच्युरी जागा वाटपात नाही तर विजयात देखील मारावी असे अनेक लोकांना वाटत आहे. शिवसेनेने सेंच्युरी मारावी अशी लोकांची अपेक्षा आहे .  याद्या जरी जाहीर झाल्या नसल्या तरी एबी फॉर्म दिलेले आहेत . कोणी अर्ज भरले उद्यापासून सामना वर्तमानपत्रामध्ये या संदर्भात माहिती यायला सुरुवात होईल, असेही संजय राऊत म्हणाले. 


तरुणांचं राजकारणात स्वागत : संजय राऊत


संजय राऊत म्हणाले,  दादर मतदारसंघात आमच्याच परिवारातील अमित ठाकरे निवडणुकीला उभे असतील तर तरुणांचं राजकारणात स्वागत करावं आमची परंपरा आणि संस्कृती आहे. दादर माहीम मतदारसंघात शिवसेनेची स्थापना झाली त्या मतदारसंघात शिवसेना लढणार नाही असे कधी होणार नाही. 


एकनाथ शिंदे स्वतः बाल बुद्धीचे : संजय राऊत


एकनाथ  शिंदेंकडे कुठला मोठा माणूस आहे ते स्वतः बाल बुद्धीचे आहेत.  या निवडणुकीनंतर ते राज्याचे मुख्यमंत्री नसणार.  शिंदे नाराज आहेत त्याला मी काय करू काही दिवसांनी ते कोमात गेलेले असतील.  भारतीय जनता पक्षाबरोबर आमचा अनुभव 25 वर्षाचा आहे आम्हाला माहित आहे तो  काय पक्ष आहे .  अडीच वर्ष त्यांनी शिंदेंना खेळवलं,बागडवलं वापरलं...  आज ते निराशेत आहेत उद्या कोमात जातील, असेही राऊत म्हणाले.  


हे ही वाचा :


सेनाभवनाच्या अंगणातला आमदार, शिंदेंचा कट्टर समर्थक आता राज ठाकरेंच्या मुलाला भिडणार, कोण आहेत सदा सरवणकर?