Maharashtra Vidhan Parishad : मुंबई महानगरपालिकेत सॅनिटरी नॅपकिन खरेदीमध्ये 42 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप अनिल परब यांनी विधानपरिषदेत केला. या आरोपानंतर अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये खडाजंगी झाली. गोंधळानंतर काही काळासाठी सभागृह तहकूब करावे लागले.
मुंबई महापालिकेत सॅनिटरी नॅपकिन खरेदीत 42 कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप अनिल परब यांनी केला. 5 हजार सॅनिटरी नॅपकिन मशीन मुंबईतील शौचालयात बसवण्यासाठी सरकारने 40 हजारांची मशीन 70 हजारांना खरेदी केल्याचा आरोप परब यांनी केला. त्यानंतर विधानपरिषदेत मंत्री शंभूराजे देसाई आणि अनिल परब यांच्यात शाब्दिक चकमक झाली. देसाई यांनी दिलेले उत्तर चुकीचं आहे, घोटाळा झाल्याचा आमच्याकडे पुरावा असल्याचे परब म्हणाले. पूर्व इतिहास नसलेल्या कंपनीला चुकीच्या पद्धतीने कंत्राट दिल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. तसेच मंत्री शंभूराजे देसाई विसंगत माहिती देत असल्याचा आरोप करत हक्कभंग आणण्याचा इशारा परब यांनी दिला.
काय आहे आरोप ?
मुंबई महानगरपालिकेतील कचरा विभागामार्फत सॅनिटरी मिटिंग मशीन बसवण्यासाठी 42 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप अनिल परब यांनी केला. ज्या कंपनींना हे कंत्राट मिळालं ती कंपनी केंद्रातील आहेत. रियलझेस्ट वेंडकॉन, किरवॉन वेंडसोल, पीआर एंटरप्राईजेस या कंपन्यांची डिसेंबर 2022 निविदा प्रक्रियेत सहभागी होणे त्याच महिन्यात त्यांना निविदा मिळते. विशषेता त्यांना याच वर्षी मान्यता मिळाली. त्यांना हे 5 हजार मशिन बसवण्याची निविदा काढण्यात आली. विशेषता या मशिनची किंमत 70 हजार दाखवण्यात आली असून बाजारात त्याची किंमत 40 हजार असून निवेदा मध्ये ती वाढवून लावण्यात आली आहे. हेच का गतिमान सरकार आहे का? महिलांच्या सॅनटरी नॅपकिंनमध्ये असे भ्रष्टाचार हे योग्य नाही. याबाबत संबधित जबाबदारांवार कारवाई करणार का ? या निविदा रद्द करणार का? असा सवाल परब यांनी उपस्थित केला.
मंत्री शंभूराज देसाई यांनी काय उत्तर दिले?
अनिल परब तावतावाने बोलत होते, मात्र मुंबईत 8 हजार 173 स्वच्छ्तागृह आहेत. जे सँनिटरी मशीन बसवण्यात आले आहेत, यामधे भ्रष्टाचार झालेला नाही. 76 हजार किमतीचे मशीन आपण बसवले आहेत. दोन सुविधा एकत्र देणारे एक मशिन घेण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन टेंडर काढण्यात आले होते. टेंडर कमिटीने माहिती घेतली आणि त्यानंतरच आम्ही मशीन खरेदी केली आहे. महापालिकेचे हित साधण्याचा प्रयत्न आम्ही केले, असे देसाई म्हणाले.
अनिल परब आणि शंभुराज देसाईंमध्ये खडाजंगी
शंभूराजे देसाई यांनी सभागृहाला दिलेली माहिती चुकीची आहे. मी हे सिद्ध केलं तर आम्ही त्यांच्यावर हक्कभंग अणू. आम्ही मुंबईत राहतो त्यामुळं नेमके यांनी भ्रष्टाचार कसा केला हे आम्ही सांगू शकतो. शंभूराजे देसाई यांनी दिलेली माहिती चुकीची आहे. त्यांनी सभागृहाची दिशाभूल केली आहे, असे अनिल परब यांनी विधान परिषदेत सांगितली. यावर शंभूराज देसाई म्हणाले की, मी मुंबईतील मंत्री नसलो तरी मी राज्याचा मंत्री आहे. अनिल परब यांनी जोरात बोलू नये. त्यांना ठसका लागेल. जे आरोप अनिल परब यांनी केले, मुळात एक निवेदा समिती असते ती याची माहिती घेत असते. कोणतीही अनियमितता झालेली नाही मी हे स्पष्ट करत आहोत.