Maharashtra Vidarbha Rain : राज्यात सध्या पावसाचा (Rain) जोर वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आजही राज्यात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन दिवस पूर्व विदर्भात (Vidarbha) पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने (IMD) आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर भंडारा नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


उद्याही पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा इशारा हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक वेधशाळेने दिला आहे. बंगालच्या उपसागरात उत्तरेला सायकलोनिक सर्क्युलेशनमुळे पूर्व विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.


आजही राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा


आज राज्यात कुठं पावसाचा ऑरेंज अलर्ट तर कुठं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज कोकणातील रायग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह ठाणे सिंधुदुर्ग, यवतमाळ, नागपूर, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  


महत्वाच्या बातम्या:


Weather Update Maharashtra: राज्यभरात सरासरीपेक्षा जास्त बरसला पाऊस; आणखी जोर वाढणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज