बेळगाव : वारीत माणसं हरवत नाहीत, तर सापडतात... पंढरीची वारी (Pandharichi wari) चित्रपटतील हा डायलॉग अनकेदा प्रचिती आणून दाखवतो. काही दिवसांपूर्वी रेनकोट विकणाऱ्या एका मुलाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. पंढरीच्या चंद्रभागेतिरी हा मुलगा रेनकोट विकत होता, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि या व्हायरल व्हिडिओमुळे एका माऊलीची व तिच्या कुटुंबाची भेट झाली. हरवेलली आई पंढरीच्या वारीत सापडली होती. आता, दक्षिण कर्नाटकामधील एका वारकरी (Warkari) कुटुंबातील महाराज म्हणजेच त्यांचा पाळीव श्वान (Dog) वारीच्या दिंडीत हरवला होता. मात्र, तब्बल 250 किमीचा प्रवास करुन हा महाराज त्याच्या मालकाच्या घरी, गावातील स्वगृही परतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वारीच्या गर्दीत माणसंच नाही, तर पशूही हरवत नाहीत, हेच या घटनेतून सिद्ध समोर आलंय

  


पंढरपूरच्या आषाढी वारीच्या दिंडीत निपाणी तालुक्यातील यमगर्णी येथून गेलेल्या श्वानाची पंढरपूर येथून परत येताना चुकामूक झाली. पण, चार दिवसांनी हा श्वान पंढरपूर येथून चालत गावात पोहोचला, आपल्या मालकाच्या घरी परतला. वारकरी आणि या श्वानाचे मालक कमलेश कुंभार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आम्ही लहानपणापासून या कुत्र्‍याला (महाराजला) पाळलं असून त्याला लहानपणापासूनच देवाकडे जाण्याची ओढ आहे. 6 जानेवारी रोजी तो आमच्यासोबत पंढरपूरसाठी दिंडीत निघाला होता. या दिंडीत तो 20 किमी चालला, तेथून तो दुसऱ्या दिंडीत गेला. त्यामुळे, तो आमच्यापासून दूर केला, तो सापडलाच नाही. आम्ही 14 जुलै रोजी पंढरपूरला पोहोचलो. 15 जुलै रोजी आम्हाला तो पंढरपुरातील एका दिंडीत आल्याचे समजले. तेथूनच तो आम्हाला मिळाला. त्यानंतर, तीन दिवस आमच्यासोबत भजन, किर्तनात दंग झाला. परतीच्यावेळी आम्ही दिंडीसोबत गावाकडे निघालो, तोपर्यंत तो तिथून पसार झाला. आम्ही त्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो सापडला नाही. 


बा विठ्ठलानेच घराचा मार्ग दाखवला


गुरुपौर्णिमेला तो नरसिंग मंदिरात असल्याचे समजले, तेव्हा आम्ही पुन्हा शोध घेण्यासाठी गेलो. पण, तो दिसून आला नाही. पण, आमच्या गावातील काही लोकांना तो पुन्हा दिसल्यानंतर त्यांनी गाडीत टाकून त्याला गावात आणलं. गावात आणल्यानंतर त्याला मंदिरात ठेवले, त्यानंतर आम्ही सगळेजण मंदिरात जाऊन त्याची पूजा करुन त्याला घरी घेऊन आलो. तब्बल 250 किमीचा प्रवास करुन तो घरी परतलाय, बा विठ्ठलानेच त्याला घराचा मार्ग दाखवला, असे कमलेश कुंभार यांनी सांगितले. तसेच, आमचा हा महाराज दोनवेळा ज्योतिबाला जाऊन आलाय, एकवेळा फैजलाबादला जाऊन आलाय, त्याला सगळा रस्ता माहितीय, असे या श्वानाचे मालक कुंभार यांनी सांगितले.


हेही वाचा 


आई 250 रुपयाने मजुरीला जातेय, लेकानं मिळवली 14 लाखांची फेलोशीप; माऊलीच्या कष्टाचं चीज झालं