मुंबई : काल मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधून सर्वसामान्यांना लोकल सुरु करण्यासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. हॉटेल रेस्टॉरंटबाबतचा निर्णय टास्क फोर्सच्या बैठकीनंतर घेतला जाणार असल्याचे सांगितले होते. मात्रं प्रार्थनास्थळं, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्याबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत आज टास्क फोर्सच्या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. जाणून घेऊया टास्क फोर्सच्या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आहे.
टास्क फोर्सच्या बैठकीत आज नेमकी काय चर्चा झाली?
- हॉटेल- रेस्टॉरंट आणि मॉल खुले करण्यासंदर्भात बैठकीत सखोल चर्चा झाली
- हॉटेल-रेस्टॉरंट -मॉल टप्प्याटप्यानं यांसाठी शिथिलता देण्याबाबत विचार झाला.
- हॉटेल - रेस्टॉरंटला रात्री 10 पर्यंत शिथीलता देता येऊ शकेल. मात्र, त्यासाठी काटेकोर नियमावली तयार होणार
- त्यानंतर मॉल खुले करण्याबाबतही विचार केला जाऊ शकेल. मात्र त्यासाठीही काटेकोर नियमांची अंमलबजावणी आवश्यक आहे.
- धार्मिक कार्यक्रम, प्रार्थनास्थळे, सामाजिक कार्यक्रम याकरता लगेच शिथीलता देता येणार नाही असे मत मांडण्यात आले
- शिथिलीकरणासंदर्भातली नियमावली टास्क फोर्स तयार करेल आणि ती मुख्य सचिव, मुख्यमंत्र्यांसमोर सादर होईल.
- तिसरी लाट कधी येऊ शकते? राज्याची तिस-या लाटेचा सामना करण्याची तयारी आहे का?
- नियम शिथिल केले तर काय परिणाम होऊ शकतात? लसपुरवठाही अपुरा पडतोय. या सर्व बाबींचा विचार करुन निर्णय होणार आहे.
15 ॲागस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार
15 ॲागस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल याबाबत घोषणा केली. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरा डोस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना 15 ऑगस्ट पासून उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी रेल्वेचा पास ॲपवरून डाऊनलोड करू शकतील आणि ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही असे प्रवासी शहरातील पालिकेच्या प्रभाग कार्यालयातून तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांमधून फोटो पासेस घेऊ शकतील. या लोकल प्रवासाच्या पासेसवर क्यू आर कोड असतील असेही ते म्हणाले.
संबंधित बातम्या :
CM Speech Highlights : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे दहा मुद्दे!
Special Report : कसा काढावा लोकलचा पास? रेस्टाॅरंट, माॅल, जिमसाठीही क्यूआरकोड?