मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा जनतेशी संवाद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री नेमकं कोणत्या मुद्द्यावर बोलतील याची उत्सुकता सर्वांना होती. मुख्यमंत्री आजच्या संवादात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. जाणून घेऊया मुख्यमंत्र्याच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत
मुख्यमंत्र्याच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे
- लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास
ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
- आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा काढावी
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणा संदर्भात पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली. यावेळी राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार देण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे त्यांनी हा अट काढली आहे. मात्र, आरक्षणाला 50 टक्क्यांची मर्यादा आहे. ही अट काढली नाही तर राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार देऊन काहीही उपयोग नाही. त्यामुळे ही अटही केंद्र सरकार काढतील अशी आमची अपेक्षा आहे.
- हॉटेल रेस्टॉरंटबाबतचा निर्णय उद्या जाहीर
हॉटेल रेस्टॉरंटबाबतचा निर्णय उद्या जाहीर करणार आहे. उद्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हॉटेलबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे
- सिंधुदुर्ग रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, बीड, पुणे, सांगली प्रादुर्भाव कायम
सिंधुदुर्ग रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, बीड, पुणे, सांगली अशा काही जिल्ह्यात अजून कोरोना प्रादुर्भाव अद्याप कमी झाला नाही. ते जिल्हे सोडून उर्वरित ठिकाणी काही निर्बंध शिथील केले आहेत.
- मंदिरे, प्रार्थनास्थळांबाबत अद्याप निर्णय नाही
मंदिरे, प्रार्थनास्थळांबाबत टास्कफोर्सशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
- नीरज चोप्राचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णफेक करत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. नीरजनं इतिहास रचत चमकदार कामगिरी नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तब्बल 13 वर्षानंतर म्हणजे 2008 बीजिंग ऑलिम्पिकनंतरचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे.
- कार्यालयीन वेळेची विभागणी करा
राज्यातील कार्यालयांनी आपल्या कार्यालयीन वेळेची विभागणी करा. आपल्याला काम बंद करायचं नाही. त्यामुळे आपले सर्व कारभार 24 तास उघडे ठेवू. पण कामाच्या वेळा, त्यांची विभागणी करु. गर्दी टाळा.
- कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे
निर्बंध शिथिल केले तरी कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे. मास्क घालणं, वेळोवेळी हात धुणं आणि सोशल डिस्टन्स ठेवणं गरजेचं आहे.
- संयम तुटू देऊ नका
राज्यातील सर्व सेवा टप्प्याने सुरु करणार आहोत. मात्र, यासाठी पुढचे आठ ते दहा दिवस लागणार आहेत. सगळ्यांचा संयम आता थोडा-थोडा तुटत आला आहे. पण संयम तुटू देऊ नका. कारण हा धोक्याचा क्षण असतो. कारण ज्यावेळी आपल्याला वाटतं आता कोरोना गेला त्याचवेळी जास्त धोका असतो.
- जिनोम सिक्वेन्सींग लॅब
कोरोनाचा विषाणू वेगाने बदलत आहे. हे लक्षात घेता नागरिकांनी वेळेत उपचार मिळावे यासाठी मुंबई महापालिकेने जिनोम सिक्वेन्सींग लॅब सुरु केली आहे. या लॅबचा उपयोग राज्याला देखील होणार आहे.