मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. आज 4,505  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 568 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 51 हजार 956रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.76टक्के आहे. 


राज्यात आज 68 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 44 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  68 हजार 375 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (8), धुळे (0) , हिंगोली (83), नांदेड (48), अमरावती (89), वाशिम (84), भंडारा (1), गोंदिया (86), गडचिरोली (21) या नऊ जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 149 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


धुळ्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर अहमदनगरमध्ये सर्वाधिक 575 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 97,25, 694 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,57, 833 (12.79 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,21,683 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2, 895 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 



मुंबईत गेल्या 24 तासात 208 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


मुंबईत गेल्या 24 तासात 208 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 372 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,15,389 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3,961 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1680 दिवसांवर गेला आहे. 


काही ठिकाणी निर्बंध शिथील 
राज्यात सिंधुदुर्ग रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, बीड, पुणे, सांगली अशा काही  जिल्ह्यात अजून कोरोना संसर्ग वाढता आहे ते जिल्हे सोडून उर्वरित ठिकाणी काही निर्बंध शिथील केले आहेत.