मुंबई: गाडी चालवताना आता वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करत असाल तर आता तुमच्या खिशाला फटका बसू शकतो. कारण राज्य परिवहन विभागाने आता वाहतूकीच्या नियमांचा भंग केल्यास भला मोठा दंड आकारण्याची तयारी सुरु केलीय.
राज्यात नागरिकांकडून परिवहन विभागाच्या वाहतूकीच्या नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जातं. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात बरीच वाढ झाल्याचं दिसून येतंय. त्याला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने नवीन दंडाची नियमावली तयार केली असून ती राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे.
हौसेला मोल नाही! 39 लाखांची गाडी आणि 34 लाखांची नंबर प्लेट
बेस्ट बसमधून विना तिकीट प्रवास केल्यास 1200 रुपये दंडाची तरतूद नव्या प्रस्तावात करण्यात आली आहे. गाडी चालवताना मोबाईलवर बोलत असल्यास दोन हजार रुपयांचा दंड लागणार आहे. गाडीची कागदपत्रे नसल्यास 200 ते 300 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच लायसन्स नसताना गाडी चालवल्यास 500 रुपयांचा दड भरावा लागणार आहे.
गाडीची पीयूसी नसल्यास दोन हजारांच्या दंडाची शिफारस करण्यात आली आहे. निशिध्द क्षेत्रात प्रवेश केल्यास पाच हजार रुपयांच्या दंडाची शिफारस करण्यात आली आहे. गाडी चालवत असताना मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर सुरु ठेवल्यास तो आता वाहतूकीच्या नियमांचं उल्लंघन समजून त्यावर आता दंड भरावा लागणार आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक किंवा माल वाहतूक करणे, सिग्नलचे नियम मोडणे, अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालविणे अशा अनेक गोष्टींचाही त्यात समावेश आहे.
ॲाटो मोबाईल इंडस्ट्रीची कोरोनावर मात; आरटीओच्या तिजोरीत बक्कळ महसुलाची भर
राज्य परिवहन विभागाने जवळपास 150 गोष्टी अशा काढल्या आहेत ज्यांचं उल्लंघन केल्यास भला मोठा दंड आकारला जाऊ शकतो. राज्य परिवहन विभागाने या नव्या नियमावलीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला असून राज्य सरकारची याला मंजूरी मिळाल्यास राज्यात नवीन वाहतूक दंड प्रणाली लागू होणार आहे.
'या' आमदाराच्या गाडीवर वाहतूक पोलिसांची एकाच महिन्यात दोनदा कारवाई
पहा व्हिडीओ: Maharashtra Traffic Fines | राज्यात लवकरच नवीन दंड आकारणी; 'हे' नियम मोडल्यास कारवाई