मुंबई : हौसेला मोल नसतं... एखादी आवडती गोष्ट असेल तर त्यासाठी कितीही पैसे मोजणारे लोकं आहेत. असाच एक हौशी व्यक्ती सध्या चर्चेत आहे. अहमदाबादमधील एका व्यक्तीने एसयूव्ही कारच्या नंबर प्लेटसाठी तब्बल 34 लाख खर्च केले आहेत. म्हणजे या व्यक्तीने गाडी खरेदी करायला जितके पैसे खर्च केले जवळपास तिककेच पैसे नंबर प्लेटसाठी खर्च केले आहेत.
हॉलिवूडमधील जेम्स बॉन्ड सिनेमांच्या सीरिजचे जगभरात करोडो दिवाने आहेत. भारतातही जेम्स बॉन्डचे चाहते आहेत. जेम्स बॉन्ड म्हटलं की त्याचा सिक्रेट कोड '007' सगळ्यांच्या लक्षात येते. अहमदाबादमधील आशिक पटेल हे देखील जेम्स बॉन्डचे चाहते आहेत. आशिक यांनी 39.50 लाखांची फॉर्च्युनर (Toyota Fortuner SUV VIP Number) कार खरेदी केली. मात्र गाडीला 007 हा नंबर घ्यायचा हे त्यांच्या डोक्यात होतं. मात्र हा नंबर सहजासहजी मिळणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी 007 या नंबरसाठी 34 लाख रुपये मोजले आहे.
अहमदाबाद आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, एका फॅन्सी नंबर प्लेटसाठी 34 लाखांची बोली गेल्या काही दिवसातील सर्वात मोठी रक्कम आहे. ही संपूर्ण रक्कम मिळाल्यानंतर आशिक पटेल यांना त्यांच्या आवडीची नंबर प्लेट दिली जाणार जाणार आहे.
कोरोना काळात आश्चर्याची बाब म्हणजे साथीच्या काळात फॅन्सी नंबर प्लेटच्या लिलावात भाग घेणाऱ्यांची संख्या घटली आहे. बोली लावणाऱ्यांची संख्या 100 पेक्षा कमी झाली होती. 24 नंबरसाठी 622 जणांनी बोली लावली. त्यात '101 'या फॅन्सी क्रमांकासाठी दुसर्या क्रमांकाची सर्वात मोठी 5.65 लाखांची बोली लागली आणि त्यानंतर 0369 या नंबरसाठी 1.40 लाखांची बोली लागली आहे.