पालघर : मुंबई अहमदाबाद महामार्गवार  एकाच दिवशी दोन भीषण अपघात झाले आहेत. हे दोन्ही अपघात वेगवेगळ्या ठिकाणी झाले असून यात दोन बाईक राईडर्सचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी आहे.


मुंबई अहमदाबाद महामार्गवारील या घटनेमधील एक अपघात चारोटी उड्डाणपुलावर घडला असून बाईक राईडर पुलाच्या खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जखमी आहे. मृत्यू झालेल्या मुलगा मीरा रोड येथील राहणारा असून सिद्धेश परब असं त्याचं नाव आहे. तर महामार्गवारील दुसरा अपघात आंबोली अहुरा हॉटेल समोर घडला आहे. बाईक कंटेनरला ठोकल्याने अपघात झाला असून यात आंबोलीतील सफाळे येथे राहणाऱ्या मोहनिष राऊतचा मृत्यू झाला आहे.


आठवड्याच्या प्रत्येक शनिवार-रविवार हे बाईक रायडर या महामार्गवार धूम स्टाईलने बाईक रायडिंग साठी येत असतात. मुंबईतून पालघर भागात येणाऱ्या भरधाव बाईक रायडर्स मुळेआता पर्यँत अनेक अपघात झाले आहेत. स्थानिकांच्या तक्रारीनंतरही वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष होताना पाहायला मिळतं आहे.