Three Children Drown In Pond In Jalna: नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळेकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. ही घटना जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील (Partur)  संकणपुरी गावात (Sankanpuri Village) गुरूवारी (24 मार्च) दुपारी घडलीय. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आद्याप कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही, अशीही माहिती मिळत आहे. 


उमेश नाचण (वय, 11) करण नाचण (वय, 14) अजय टेकाळे (वय, 13) अशी मृत मुलांची नावे आहेत. हे तिघेही गुरुवारी पोहण्यासाठी गावातील नदीवर पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्यानं तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झालाय, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. एकाच गावातील तीन मुलांचा मृत्यू झाल्यानं गावात शोककळा पसरली आहे. 


पुण्याच्या दौंडमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू 
पुण्याच्या दौंड तालुक्यातून 7 मार्च रोजी अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. दरम्यान,  दौंड तालुक्यातील साठवण तलावात बुडून तीन तरूणांचा मृत्यू झाला होता. हे तिघेही फोटो शूट करण्यासाठी या साठवण तलावाजवळ गेले असल्याची बोलले जात आहे. दौंड कुरकुंभ मार्गावरील मोरेवस्ती जवळ ही घटना घडली होती. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केलीय. तसेच या तिघांचा कशामुळं मृत्यू झाला? याचाही शोध घेतला जात आहे. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha