Maharashtra temperature update: राज्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढलाय .बहुतांश ठिकाणी सामान्य तापमानाहून अधिक तापमानाची नोंद होत आहे .कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात 35 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान पोहोचलं आहे .विदर्भात रखरख प्रचंड वाढली आहे .सर्व जिल्ह्यात 36° ने अधिक तापमानाची नोंद होतेय .हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार,येत्या 2 दिवसात तापमानात फारसा बदल नसला तरी त्यानंतर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 2 ते 3 अंशांनी तापमान वाढणार आहे . (IMD forecast) उष्णतेची धग आता चांगलीच जाणवू लागलीय. विदर्भात पुढील दोन दिवसात 3 ते 5 अंशांनी तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे . (Temperature Update)


बुधवारी (5 मार्च) सकाळपर्यंतच्या 24 तासांत राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. सोलापूरनंतर चंद्रपूर येथे सर्वाधिक 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. मध्य महाराष्ट्रातील जेऊर, सांगली आणि मराठवाड्यातील परभणीसह विदर्भातील अकोला, ब्रह्मपुरी येथे तापमान 38 अंशांच्या पुढे गेले. कोल्हापूर, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथेही तापमान 37 अंशांच्या पुढे पोहोचले आहे.


पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तापला


पुण्यासह मध्य महाराष्ट्रात सध्या प्रचंड शुष्क आणि कोरड्या वाऱ्यांमुळे तापमान वाढलं आहे .पुण्यात बुधवारी 36.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली .तर सातारा 36.8 ,कोल्हापूर 37अंश सेल्सिअस तापमान होते .नाशिक (35) अहिल्यानगर (34 .9)तर सोलापूर आता सर्वाधिक 39.4 अंश सेल्सिअस तापमान होते .मध्य महाराष्ट्र एका दोन दिवसात आणखी  तापणार आहे .त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून वाचण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे .


मराठवाड्यात कुठे कसे तापमान ?


 मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी 36 अंशांच्या पुढे तापमानाची नोंद झाली .परभणीत 38.0 अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमान होते .छत्रपती संभाजीनगर 35.5 ,बीड 37.6,धाराशिव 36.6अंशांवर होते .पुढील तीन ते चार दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर मराठवाड्याच्या दक्षिण भागात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. तर विदर्भ सध्या तापमानाच्या उच्चांकावर आहे .चंद्रपूर 39 अंश तर अकोला 38.5 ,अमरावती 37 नागपूर 37.6 भंडारा 37 , गडचिरोली 37.4 असे तापमान होते .


 



हेही वाचा:


Temperature Today: राज्यातील तापमान चाळीशीच्या उंबरठ्यावर, सोलापुरात 39.4°C देशातील सर्वाधिक, कुठे काय तापमान?