Sanjay Raut : शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्लीत आल्यावर AK47 ने उडवून टाकू असा धमकीचा मेसेज राऊतांना आला आहे. लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून धमकी मिळाली आहे. संजय राऊत धमकी प्रकरणी पुण्यातून (Pune) दोन जणांना ताब्यात घेतले आहे. काल राऊत यांच्या मोबाईलवर धमकीचे मेसेज आले होते.
 
दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी चौकशीसाठी पोलिस आले आहेत. पण सध्या संजय राऊत हे सामना ऑफिसमध्ये गेले असून घरी त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत (Sunil Raut)आहेत. सुनील राऊत यांच्याकडे पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातून राहुल तळेकर ( वय साधारण 23) या तरुणाला पुण्यातील गुन्हे शाखेने काल रात्री उशिरा अटक केली आहे. ही अटक पुण्यातील खराडी भागातून करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आणि पुणे पोलिस यांच्या गुन्हे शाखेनं संयुक्त कारवाई केली आहे. राहुल तळेकरला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 


धमकीबाबत गृहमंत्री चेष्ठा करतात


महाराष्ट्रातील सगळी सुरक्षा व्यवस्था ही गद्दार गटाचे आमदार, खासदार त्यांचे पदाधिकारी यांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात होणाऱ्या दंगली, महाराष्ट्रात महिलांवर होणारे अत्याचार अशा घटना घडत आहेत. पण राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या घटनांकडे पाहायला वेळ नाही. आम्ही जेव्हा अशा प्रकारच्या धमक्यांची माहिती देतो तेव्हा गृहमंत्री चेष्ठा करतात. आमचा स्टंट असल्याचे ते बोलतात. मला ठाण्यातून आलेल्या धमकीत मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांचे नाव आहे. ही गोष्ट तुम्ही गांभीर्यानं घेत नाही. काल रात्रीसुद्धा मला एक धमकी आल्याचे राऊत म्हणाले. 
ही माहिती मी पोलिसांना कळवली असल्याचे राऊत म्हणाले. 


हे सरकार धमक्यांना गांभीर्यानं घेत नाही


विरोधी पक्षांच्या नेत्यांना आलेल्या धमक्या हे सरकार गांभीर्यानं घेत नाही. पोलिस यंत्रणा फक्त विरोधकांवर कारवाया करण्यासाठी वापरत आहेत. पण आम्ही आहे त्या संकटाला सामोरं जाऊ असेही राऊत म्हणाले.  राज्यातील सरकार हे गेंड्याच्या कातडीचे आहे. विरोधकांना तुरुंगात टाकत आहे. राज्यात सरकारप्रणित काही ठिकाणी गोंधळ निर्माण करण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप राभतांनी केली. 


लॉरेन्स बिश्नोईवर गुन्हा दाखल


दरम्यान, संजय राऊत धमकीप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांजूर मार्ग पोलीस  स्टेशनमधे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगनं धमकी दिल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता.


महत्त्वाच्या बातम्या:


Sanjay Raut: संजय राऊतांना 100 कोटींच्या मानहानीची नोटिस; मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नोटीस