शिर्डी : शिर्डीच्या साईबाबांचं मंदिर 31 डिसेंबरला बंद राहणार आहे. नव्या वर्षात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर साईसंस्थानाने हा निर्णय घेतलाय. 1 जानेवारीला सकाळी सहा वाजता शिर्डीचं साई मंदिर उघडणार आहे.
दरवर्षी 31 डिसेंबरच्या भक्तांच्या सोयीसाठी रात्रभर साईमंदिर खुले ठेवले जाते. यावर्षी मात्र निर्बंधामुळे साईमंदिर राहणार बंद राहणार आहे. साईमंदिर प्रशासनाने प्रसिद्धी पत्रक काढून निर्णय जाहीर केला आहे. तसेच पहाटेची काकड आरती व शेजारतीमध्ये भाविकांना प्रवेश मिळणार नाही. साईबाबा मंदिरातील लाडू केंद्र, प्रसादालयदेखील बंद ठेवलं जाणार आहे. संचारबंदीमुळं मंदिरातील वेळत बदल करण्यात आलाय. तसेच कॅन्टनची सुविधाही भाविकांसाठी बंद राहणार आहे. शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, .प्रसादालयात एकाच वेळी एक हजारांहून अधिक भाविक प्रसाद भोजन करतात. मात्र, राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलीय. त्यानुसार, पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास मनाई आहे.
राज्यात गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून आले आहेत. ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आले आहे.
काय आहेत निर्बंध?
- संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल.
- लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते.
- इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते.
- उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही. अशा ठिकाणी 25 टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या 25 टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- Corona in Mumbai : मुंबईकरांनो अधिक काळजी घेण्याची वेळ आली, कोरोना रुग्णवाढीचा दर वाढतोय
- पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात लसीकरण वेगाने होईल ते पहावं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश
- Mumbai Corona Update : मुंबईत धोका वाढताच, सोमवारीही 809 नवे कोरोना रुग्ण, रुग्णवाढीचा दरही वाढला