मुंबई : मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीने (Corona Virus) संपूर्ण जगाची चिंता वाढवली असून भारतातही या महामारीने धुमाकूळ घातला आहे. त्यात देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्येही कोरोनाने (Mumbai Corona) बरंच नुकसान केलं आहे. अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे, असे वाटत असताना ओमायक्रॉनच्या (Omicron) एन्ट्रीनंतर आता कोरोना रुग्णसंख्याही वाढू लागली आहे. दरम्यान रुग्णवाढीचा दर आणि रुग्ण दुपटीचा दरही चिंताजनक असल्याने मुंबईकरांना आता अधिक काळजी घेण्याची वेळ आली आहे.
मुंबईत आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून 500 हून अधिकच आहे. त्यात रविवारी (26 डिसेंबर) तर तब्बल 922 कोरोना रुग्ण आढळले. त्यानंतर सोमवारी (27 डिसेंबर) ही संख्या 809 झाली असली तरी रुग्णवाढीचा आणि दुपटीचा दर मात्र वेगाने वाढत आहे. अवघ्या एका दिवसात रुग्ण वाढीचा दर 0.06 टक्क्यांवरुन 0.07 टक्के इतका झाला आहे. याशिवाय रुग्ण दुपटीचा दरही रविवारी 1 हजार 139 इतका होता. जो एका दिवसात हजारच्या खाली गेला असून 967 दिवसांवर गेला आहे. ही आकडेवारी हा चिंतेचा विषय होऊ लागला आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढलीच आहे. पण मुंबईकरांना अधिक काळजी घेण्याची गरजही निर्माण झाली आहे. महापालिकेतर्फे दररोज समोर येणारे कोरोना रुग्ण आणि वाढीचा दर अशा साऱ्या गोष्टी सांगितल्या जातात. त्यानेच समोर आलेल्या या माहितीनुसार मुंबईकरांनी काळजी घेणे आता अनिवार्य झाले आहे.
मागील काही दिवसांतील कोरोना वाढीचा दर-
सोमवारी मुंबईत समोर आलेली रुग्णसंख्या
सोमवारी (27 डिसेंबर) मुंबईत 809 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 335 रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या मुंबईत 4 हजार 765 सक्रीय कोरोनारुग्ण आहे. तर मुंबईतील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97 टक्क्यांवर गेले आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर 967 दिवसांवर गेला आहे.
- पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात लसीकरण वेगाने होईल ते पहावं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश
- Mumbai Corona Update : मुंबईत धोका वाढताच, सोमवारीही 809 नवे कोरोना रुग्ण, रुग्णवाढीचा दरही वाढला
- Exclusive : मुलांच्या लसीकरणाबाबत पडलेल्या प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर; जाणून घ्या चाईल्ड टास्क फोर्सच्या सदस्यांकडून
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha