मुंबई : एचडीएफसी (HDFC Bank) आणि अ‍ॅक्सिस बॅंकेच्या  (Axis Bank) ग्राहकांच्या खिशाला नव्या वर्षात कात्री लागणार आहे. एचडीएफसी बॅंकेच्या ग्राहकांनी इतर बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढले तर त्यांना प्रत्येक व्यवहारावर 21 रूपये चार्ज लागणार आहे. जीएसटी अंतर्गत हा बदल करण्यात आला असून 1 जानेवारीपासून हा नियम लागू होणार आहे. तर  अ‍ॅक्सिस बॅंकेकडून त्यांच्या ग्राहकांसाठी 10 रूपये चार्ज लावण्यात येणार आहेत. 


रिझर्व बॅंकेच्या नियमानुसार इतर बॅंकेच्या एटीएममधून महिन्यातून पाच वेळा पैसे काढल्यानंतर त्यावर चार्ज आकरण्यात येत नाही. परंतु, सहाव्या वेळी इतर बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढल्यानंतर त्यावर 21 रूपये चार्ज लागतो. 


मेट्रो शहरात राहणाऱ्या ग्राहकांसाठीच्या नियमातही बदल करण्यात आले आहेत. बंगळुरू, मुंबई, चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि हैद्राबाद शहरातील एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना  अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममधून तीन वेळा निशुल्क पैसे काढता येणार आहेत. परंतु, चौथ्या व्यवहारावर 21 रूपये चार्ज लागणार आहे. बॅंकेने याबाबतची माहिती ग्राहकांना पाठवली आहे. याआधी हे शुक्त 20 रूपये होते. नव्या नियमानुसार हे शुल्क 20 वरू 21 करण्यात आले आहे. 


एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये फक्त रोख पैसे काढण्याच्या व्यवहारांवर शुल्क आकारले जाईल. तर बॅलन्स चौकशी, मिनी स्टेटमेंट आणि पिन बदलासारख्या व्यवहारांवर चार्ज आकारले जाणार नाहीत. परंतु, एचडीएफसी बँकेचे कार्ड इतर एटीएममध्ये वापरले तर त्यावर चार्ज आकारण्यात येणार आहे. त्यामुळे एचडीएफसी बॅंकेच्या ग्राहकांना नव्या वर्षापासून इतर बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढताना त्या व्यवहारासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. बॅंकेने नुकतेच याबाबतचे नोटीफिकेशन जारी केले आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्वाच्या बातम्या