शिर्डी :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीची घोषणा केली. त्यानंतर 31 डिसेंबर 2016 पर्यंत जुन्या नोटा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये स्वीकारण्यात आल्या किंवा बदलून देण्यात आल्या. मात्र त्यानंतर गेल्या पाच वर्षांच्या काळात साई संस्थानच्या दानपेटीत या नोटा दान स्वरूपात येत राहिल्या आणि आज अखेर कोट्यवधी रुपयांच्या जुना नोटा साई संस्थानच्या तिजोरीत पडून आहेत. काही महिन्यापासून या संदर्भात रिजर्व बँक व केंद्रीय गृह मंत्रालयाशी पत्रव्यवहार सुरू असून सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 साईबाबा संस्थानच्या तिजोरीत तीन कोटी पेक्षा जास्त रुपयांच्या पाचशे व हजार रुपयांच्या बंद करण्यात आलेल्या आहेत. जुन्या नोटा असून विशेष म्हणजे नोटाबंदीला पाच वर्षे उलटली तरी आजही दानपेटीतील या जुन्या नोटांची आवक थांबलेली नाही. गेल्या  पाच वर्षात दानपेटीत पडणाऱ्या या नोटांनी साई संस्थानची डोकेदुखी वाढवली आहे. यासाठी केंद्रीय पातळीवर अनेकदा पाठपुरावा करण्यात आला असला तरी अद्याप मात्र यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.


दानपेटीत अजूनही कमी-अधिक प्रमाणात या नोटा आढळून येतात. अन्य देवस्थानांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे. आरबीआयने नोंदणीकृत देवस्थानांच्या दानपेटीत आलेल्या जुन्या नोटा जमा करून घेण्याची मागणी केली. साईबाबा संस्थानने केली असून सध्याच्या चलनातील इतर नोटा राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्यात येतात. मात्र जुन्या नोटा निघाल्यानंतर त्याची स्वतंत्र नोंद ठेवून त्यावर आयुक्तांच्या धर्मादाय प्रतिनिधींची स्वाक्षरी घेतली जाते. यानंतर त्या तिजोरीत ठेवण्यात येतात. आजवर संस्थानच्या तिजोरीत साचलेल्या बंद नोटांचा आकडा तीन कोटीपेक्षा जास्त असण्याची शक्यता असून नेमकी रक्कम किती हे मात्र साईबाबा संस्थान ने स्पष्ट केले नाही.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha