मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत थेट पक्षावर दावा केला. त्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar)  राज्यव्यापी दौरा करण्याचे जाहीर केले मात्र सध्या शरद पवार  सध्या कुठलाही दौरा करणार नाहीत. सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे सध्या कुठलाही दौरा करणार नाहीत. मात्र शरद पवार उद्याची येवल्याची सभा घेणार आहे. 


शरद पवार यांची उद्या येवला येथं सभा आहे. या सभेनंतर उर्वरित दौरे पवार आठ दिवसांनी करणार आहेत. पावसाळी वातावरणामुळे पवारांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय. उद्या येवल्यातील सभेनंतर पवार धुळे आणि जळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र ते येवल्याहून मुंबईला परतणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आठ दिवसांनंतर ते धुळे आणि जळगाव दौऱ्यावर निघणार आहेत. 


छगन भुजबळांना उद्याच्या सभेत पवार काय उत्तर देणार?


शरद पवारांचा आज नाशिकमध्ये मुक्काम आहे. शरद पवार यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधण्याची घोषणा केली असून त्यांची पहिली सभा छगन भुजबळांच्या येवल्यात होणार आहे. छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. या सर्व आरोपांना उद्याच्या सभेत पवार काय उत्तर देणार?, भुजबळ आणि अजित पवारांचा कसा समाचार घेणार हे उद्या स्पष्ट होईल. दरम्यान येवल्यातील सभेच्या तयारीसाठी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची बैठक होणार आहे.  


शरद पवार यांनी साताऱ्यात भूमिका मांडली आहे की, जनता आपल्या पाठीशी असून आता जनतेत जाऊन संवाद साधण्याची गरज आहे. त्यानुसार लवकरच नाशिक, बीड, अहमदनगर, सोलापूर, पुणेसह काही इतर जिल्ह्यात शरद पवार स्वतः दौरा करणार असून याबाबतची बैठक दिल्ली येथे घेण्यात येईल, असेही जयंत पाटील म्हणाले आहेत. 


तर दुसरीकडे अजित पवारांनी शरद पवारांना थेट आव्हान केले आहे. अजित पवार म्हणाले होते की, आम्हीही पक्ष बांधला आम्हालाही लोक ऐकतात... आम्हीही नेते आहोत. जर आंबेगावात पवार साहेबांनी सभा घेतली तर मलाही प्रत्युत्तर म्हणून सात दिवसांनी सभा घ्यावी लागेल. असे म्हणत अजित पवारांनी थेट शरद पवारांना आव्हान दिले होते. 


हे ही वाचा :


 घड्याळ चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही, जे माझा फोटो लावतात त्यांना माहिती आहे, त्यांचं नाणं चालणार नाही; शरद पवारांची चौफेर टीका