Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे, असा अंदाज सध्या व्यक्त होत आहे. ठाकरे गटातील एक मोठा नेता शिवसेनेत (Shiv Sena) (शिंदे गट) प्रवेश करणार आहे. ठाकरे गटातील विधान परिषदेचा एक आमदार शिंदेंच्या गळाला लागल्याची माहिती मिळत आहे. तसेच, आजच या आमदारासह काही महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही आज शिंगे गटात प्रवेश करणार आहेत.
ठाकरेंच्या विश्वासू नेता आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. हा नेता विधान परिषदेचा आमदारही आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून माध्यमांमध्ये शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे. आज दुपारीच हा प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एबीपी माझानं ही बातमी सर्वात आधी दिली. या आमदारासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत सामिल होणार आहेत.
बंडाच्या एक वर्षानंतरही ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेत येणाऱ्यांचा ओघ काही कमी होण्याचं नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश केला. मनीश कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश करताच त्यांच्यावर विश्वास दाखवत एकनाथ शिंदेंनी मोठी जबाबदारीही सोपवली. एकनाथ शिंदेनी मनिषा कायंदेंची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी केली नियुक्ती केली आहे.
त्यापूर्वी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. राहुल कनाल यांनीही शिंदे गटात प्रवेश करताच आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. त्यापूर्वी आदित्य ठाकरेंचेच निकटवर्तीय आणि माजी नगरसेवक अमेय घोले यांनीही नाराजी व्यक्त करत शिंदे गटाची वाट धरली होती.
पाहा व्हिडीओ : Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार : ABP Majha
ठाकरे गटातून अजून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. अशातच विधान परिषद आमदारासह इतरही महत्त्वाचे पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी विधान परिषदेतील शिवसेनेचे आमदार विप्लव बजोरिया आणि आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता ठाकरेंकडून कोण शिंदेंकडे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे राज्यात राजकीय भूकंप सुरू झाला आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राज्यातील समीकरणं बदलली आहेत. अशातच ठाकरेंकडून शिंदे गटाकडे जाणाऱ्यांचा ओघ अजून सुरूच आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :