मुंबई : पेट्रोल दराच्या बाबतीत महाराष्ट्रला महा'ग'राष्ट्र अशी उपमा दिली तर वावगं ठरणार नाही. कारण सध्याच्या घडीला देशात सर्वात महाग पेट्रोल हे महाराष्ट्रात विकलं जात आहे.


दारुबंदीमुळे बुडालेल्या महसुलाची तूट भरुन काढण्यासाठी राज्य सरकारनं पेट्रोलवर 3 रुपये अधिभार लावला आहे. त्यामुळे राज्यातले पेट्रोलचे दर 74 रुपयाच्या घरात गेले आहेत. नांदेड पाठोपाठ मुंबईत सर्वाधिक, म्हणजे 77 रुपये 40 पैसे प्रति लिटर दरानं पेट्रोलची विक्री सुरु आहे.

देशातल्या इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत हा दर खूपच जास्त आहे. देशाच्या आर्थिक राजधानीतील वाहनचालकांनाच मोठा फटका बसत आहे. त्यातच दारुचा अधिभार सर्वसामान्यांनी का सहन करायचा, असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे.

दारुबंदीचा फटका पेट्रोलला, पेट्रोल 3 रुपयांनी महाग


सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे महामार्गापासून 500 मीटर अंतरावरील दारु दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे त्यापासून मिळणारा महसूल बुडाला. दारुबंदीमुळे बुडालेल्या महसुलाची तूट भरुन काढण्यासाठी राज्य सरकारनं पेट्रोलवर 3 रुपये अधिभार लावला आहे.

एकीकडे सरकार पेट्रोल-डिझेलचे दर रोजच्या रोज निश्चित करण्याच्या तयारीत आहे. त्यातच महाराष्ट्र सरकारने अचानक पेट्रोलच्या दरात 3 रुपयांनी वाढ केल्याने, सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

‘लवकरच पेट्रोल, डिझेल घरपोच मिळणार’, पेट्रोलियम मंत्र्यांची ट्विटरद्वारे माहिती


राज्य सरकारने आज व्हॅट लागू केला असला तरी 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. त्यावेळी सर्व कर रद्द होणं अपेक्षित आहे. त्यावेळी पेट्रोलच्या दरावर काय परिणाम होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.