लातूर : लातूरमध्ये चक्क एका शेतामध्ये मगर आढळल्यानं खळबळ उडाली आहे. चार फूट लांब आणि 65 किलो वजनाची ही मगर बघ्यांची भंबेरी उडाली. शुक्रवारी लातूरच्या देवणी गावात ही घटना घडली.

सावजाच्या शोधात आलेली ही मगर शेतात घुसली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मगर शेतात शिरताच कुत्र्यांनी भुंकणं सुरु केल्यानं गावकरी जागे झाले. काही जणांनी शेतात जाऊन पाहणी केली असता अवाढव्य मगर पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

त्यानंतर गावकऱ्यांनी मगरीचा पाठलाग करुन तिला विहीरीत आश्रय घेण्यास भाग पाडलं. वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर मगरीला सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. मात्र भरवस्तीत मगर शिरली कशी हा प्रश्न कायम आहे.