Agriculture News : माणदेशी फाऊंडेशन (Mann Deshi Foundation) शेतकरी, महिला उद्योजक यांच्यासह विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचं व्यासपीठ बनत आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून सातत्यानं नवनवीन उपक्रम राबवले जातात. आता शेतकऱ्यांना (Farmers) जागतिक स्तरावरील कृषी तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा यासाठी माण देशी फाऊंडेशन नवीन पाऊल उचललं आहे. माण (Mann) तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अमेरिकेतील रोबो आणला आहे. या रोबोच्या माध्यमातून पिकाची पाहणी करुन, रोगांचा प्रादुर्भाव आणि त्या पिकांला आवश्यक असणाऱ्या खतांच्या मात्रा याची माहिती मिळणार आहे. म्हसवडजवळ या रोबोचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवण्यात आले.या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती माण देशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा (Chetna Sinha) यांनी दिली.

  


पुण्यातील तरुणांनी अमेरिकेत संशोधन करुन केली रोबोची निर्मिती 


या रोबोचा माणसारख्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी येथील माण देशी फाउंडेशन पुढाकार घेतला आहे. या रोबोचे म्हसवडजवळच्या ढोकमोढा येथील शेतात डाळिंब, मका, ज्वारी आदी पिकांच्या पाहणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. डाळिंब, मका, ज्वारी आणि बाजरी या चार पिकांसाठी सॉफ्टवेअर बनवले आहे. अमेरिकेतील रोबोच्या माध्यामातून शेतकऱ्यांना पिकावर झालेल्या रोगाची माहिती मिळणार आहे. तसेच पिकांना आवश्यक असणाऱ्या खतांची माहिती देखील मिळणार आहे. मूळच्या पुण्यातील रहिवासी असलेल्या चिन्मय सोनम आणि अमोल गिजरे या दोघांनी सलग चार वर्षे अमेरिकेत संशोधन करून पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी पिकांची पाहणी करुन पिकांवर कोणकोणत्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकाचा रंग, उंची आणि पीक वाढीस कोणकोणत्या अन्नद्रव्य, खतांची गरज आहे याचे अचूक विश्लेषण करणारे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्यानंतर त्यांनी स्वयंचलित रोबोट तयार केला आहे. हा चारचाकी रोबो पिकात फिरून पिकाची पाहणी करतो.




पिकाच्या वाढीसाठी आवश्यक ती माहिती 


चिन्मय सोनम आणि अमोल गिजरे या दोघांनी संशोधन करुन हा रोबोट तयार केला आहे. या रोबोटमध्ये ठिकठिकाणी स्वयंचलित कॅमेरे असून, कॅमेऱ्यांच्या साह्याने पिकाचे चित्रण करून पिकाची उंची, रंग, जाडी याच्यासह पिकावर कोणत्या कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे किंवा रोग्याची शक्यता आहे याची माहिती रोबोटमधील सॉफ्टवेअरला देतो. या माहितीचे अचूकरीत्या विश्लेषण करून हा रोबोट पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अशी आगाऊ माहिती देतो. या रोबोटला अमेरिकेतील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर  या दोघांनी मिळून रोबोट निर्मितीसाठी अर्थसेन्स नावाची कंपनी अमेरिकेत स्थापन केली आहे.  या दोघांनी मिळून आतापर्यंत अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये 120 रोबोट विकले आहेत. एक रोबोटची किंमत सुमारे 50 लाख आहे.




शेतकऱ्यांना फायदा व्हावा हाच उद्देश


पिकासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर अनावश्यक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर करतात. या रोबोटमुळं शेतखऱ्यांचा तो खर्च कमी होणार आहे. शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळणार आहे. देशातील शेतकऱ्यांना या रोबोटचा फायदा व्हावा, अशीच आमची भूमिका असल्याचे सिन्हा यावेळी म्हणाले. रोबोच्या साह्याने अचूक निरीक्षण करून संबंधित पिकाचे आरोग्य, पीक वाढीसाठी आवश्‍यक तेवढीच खते, कीटकनाशके वेळेत दिली गेली, शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल. यासाठी रोबोट उपलब्ध करून देण्याचा माण देशी फाउंडेशनचा उद्देश असल्याचे माण देशी फाउंडेशनच्या अध्यक्षा  चेतना सिन्हा यांनी सांगितले.




माणदेशाला शेतीतील आग्रेसर तालुका बवनू


माणदेशाला शेतीतील आग्रेसर असणारा तालुका आम्ही नक्कीच बनवू. जगात नवीन काय चालू आहे, नवीन कोणते विज्ञान तंत्रज्ञान आले आहे. याची आपल्याला माहिती पाहिजे असे मत माणदेशी फाऊंडेशनचे करण चिन्हा यांनी व्यक्त केले. नवीन टेक्नॉलॉजी ही यायलाच हवी. म्हणून अमेरिकेतील earthsense नावाची कंपनी पहिल्यांदाच भारतात आपल्या माण तालुक्यात एक आगळा वेगळा शेती रोबो याची पाहणी देण्यासाठी चिन्मय व अमोल आले असल्याचे करण सिन्हा म्हणाले. हा रोबो डेटा कलेक्शन आणि रोग याची पाहणी करून तो रिसर्च आणि डेव्हलपमेंट करतो. प्रत्येक रोपाची किंवा झाडाची उंची, लांबी आणि त्याचा कलर या सर्व गोष्टींचा डेटा स्टोअर करतो, त्याचबरोबर त्याला रोगरायीही समजतात. डाळिंब बागेत याचा कसा उपयोग होऊ शकतो याची पाहणी केल्याचे करण यांनी सांगितले. 


महत्त्वाच्या बातम्या:


जगातील पहिला उडता वायरलेस रोबो, नांदेडच्या तरुणाचं यश