Sangola News : परतीच्या पावसाचा (Heavy Rain) दणका हंगामी पिकांना सर्वात जास्त बसला. पाऊस संपल्याने आता हाती आलेले पीक बाजारात नेऊन दिवाळी (Diwali 2022) करायचा विचार करणाऱ्या बळीराजाला (Farmer) परतीच्या पावसाने असा दणका दिला की, त्याच्यापुढे जगायचे कसे? हा प्रश्न उभा राहिला आहे. 


सलग आठ दिवसाच्या परतीच्या पावसाचा दणका
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील लक्ष्मी नगर येथील शेतकऱ्यांनाही या परतीच्या पावसाने पार संपवले आहे. येथील लक्ष्मण गोडसे यांनी 3 एकर पैकी एक एकर विकून शेतात टोमॅटो आणि ढोबळी मिरचीचे पीक घेतले होते. झाडाला टोमॅटो चांगले लागल्याने गोडसे याना चांगली दिवाळी करता येईल अशी अशा होती. दुसऱ्या एकरात लावलेली ढोबळी मिरची देखील चांगली आल्याने चार परिसर हाताशी येतील, या आनंदात गोसाडे कुटुंब असताना सलग आठ दिवसाच्या परतीच्या पावसाने असा दणका दिला की टोमॅटो ही गेले आणि ढोबळी मिरचीही वाया गेली. प्रवास थांबताच टोमॅटो काढले असता ते सडू लागल्याने बाजारात न्यायची देखील सोय राहिली नाही. 


भुंगा लागलेल्या डाळीचे दालन आणून दिवाळी करायची वेळ


जी अवस्था टोमॅटोची झाली तशीच अवस्था ढोबळी मिरचीची झाली. पावसामुळे एका बाजूला मिरची फुटून सोडून गेल्याने पाच सहा टन मिरचीचा ढीग काढून डोक्याला हात लावायची वेळ गोडसे कुटुंबावर आली आहे. आता दिवाळीला मुलांसाठी काही तरी करायचे म्हणून रुक्मिणीबाई यांनी घरातील किडलेली डाळ निवडून घ्यायला सुरुवात केली. पण ही डाळ देखील भुंगा लागलेली असल्याने आता अशाच डाळीचे दालन आणून दिवाळी करायची वेळ गोडसे कुटुंबावर आली आहे.


शेकडो कुटुंब मदतीच्या अपेक्षेत


शिंदे फडणवीस सरकारची ना दिवाळी भेट मिळाली, ना कोणी अजून पंचनाम्याला पोचले हे वास्तव आहे. सांगोला म्हटले कि सध्या फक्त आमदार शहाजीबापू यांच्याच नावाची चर्चा असते. मात्र येथील अधिकाऱ्यांना मात्र या गोरगरीब शेतकऱ्यांच्या बांधावर जायला अजून वेळच मिळाला नसल्याने गोडसे यांच्या सारखे शेकडो कुटुंब मदतीच्या अपेक्षेत आहेत.