Maharashtra Corona Update : काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्यामध्ये घट पाहायला मिळत आहे. तीन दिवसांपासून कोरोना रुग्णवाढीचा आलेख घसरता दिसत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात चार हजार 359 नव्या रुग्णांची भर पडली आहे. शुक्रावारी राज्यात 5 हजार 455 नव्या रुग्णांची भर पडली होती.  राज्यात आज 32 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 % एवढा आहे.  मागील 24 तासांत 12 हजार 986  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आजपर्यंत एकूण 76,39,854  करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.45 टक्के एवढे झाले आहे. 


ओमायक्रॉनचे 237 नवे रुग्ण –
राज्यात आज 237 नव्या ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. यापैकी 11 रुग्ण  बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि 226 कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई यानी रिपोर्ट आले आहेत. आज आढलेलेल्या ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांपैकी 226 रुग्ण मुंबईत तर पुणे मनपा क्षेत्रात 11 रुग्ण आहेत. आजपर्यंत राज्यात  एकूण 3768 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. दिलासादायक म्हणजे, 3334 जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.  




मुंबईकरांना दिलासा, शनिवारी 349 नव्या रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 98 टक्के 
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबईत 349 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये एकही कंटेनमेंट झोन नाही. तसेच मुंबईचा रिकव्हरी रेटही 98 टक्केंवर पोहचला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याची चिन्हे आहेत. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबईत 349 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 635 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 10,31,304 इतकी झाली आहे. मुंबईतील अॅक्टिव रुग्णांची संख्या 2925 इतकी झाली आहे. मुंबईकरांना आणखी दिलासा मिळाला आहे, कारण कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी हा आज एक हजारांपार गेला आहे. मुंबईचा रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 1273 दिवस झाला आहे. मुंबईत सद्या एकही इमारत किंवा परिसर प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) नसल्याने पालिकेसह मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.