Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होऊ लागलीय. राज्यात गेल्या 24 तासात  1 हजार 684 नव्या रुग्णांची नोंद झालीय. तर, 17 जणांचा मृत्यू झालाय. याशिवाय, 918 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.67 टक्के एवढे झालंय.


राज्यात आतापर्यंत 6 कोटी 84 लाख 55 हजार 314 जणांची कोरोना चाचणी करण्यात आलीय. त्यापैकी 66 लाख 57 हजार 888 जणांची कोरोना चाचणी सकारात्मक आलीय. राज्यात सध्या 89 हजार 251 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर, 891 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


राज्यात एक नोव्हेंबर पासनू आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचेदेखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 737 प्रयोगशाळा नमुने जुनकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 126 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. राज्यात आज रोजी एकूण 9 हजार 813 सक्रीय रुग्ण आहेत. 


राज्यात आज ओमायक्रॉन संसर्गाचे 31 जणांची अहवाल पॉझिटिव्ह आलीय. त्यानुसार, मुंबईत-27, ठाणे-2, पुणे ग्रामीण- 1 आणि अकोला येथे एका ओमायक्रॉन संक्रमित रुग्णांची नोंद झालीय. देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 141 वर पोहचलीय. यातील 4 रुग्ण गुजरात, 3 रुग्ण कर्नाटक, केरळ आणि दिल्ली येथील प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत. छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, जळगाव, ठाणे, नवी मुंबई आणि औरंगाबाद येथे एक रग्ण आहेत. यातील दोन रुग्णम विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha