Sai Baba Temple: देशात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागलीय. ज्यामुळं देशभरात चिंताजनक वातावरण निर्माण झालंय. देशात सध्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 450 च्या जवळपास पोहचलीय. दरम्यान, ओमिक्रॉनचा धोका पाहता केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाली आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी संचारबंदीसह अनेक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रात रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आल्यानं शिर्डीतील साई मंदिरासाठीही नवा आदेश जारी करण्यात आलाय. 


शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, राज्यात रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत संचारबंदी लागू असल्यानं साई साईबाबा मंदिर रात्रीच्या वेळी भाविकांसाठी बंद राहणार आहे. पहाटेची काकड आरती व शेजारतीमध्ये भाविकांना प्रवेश मिळणार नाही. यावेळत साईबाबा मंदिरातील लाडू केंद्र, प्रसादालयदेखील बंद ठेवलं जाणार आहे. प्रसादालयात एकाच वेळी एक हजारांहून अधिक भाविक प्रसाद भोजन करतात. मात्र, राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलीय. त्यानुसार, पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास मनाई आहे, असं  साईबाबा शिर्डी ट्रस्टचे सीईओ आयएएस अधिकारी भाग्यश्री यांनी म्हटलंय. 


ट्वीट- 



 
दरम्यान, महाराष्ट्रात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं. जे ऑक्टोबरमध्ये पुन्हा उघडण्यात आलं होतं. सध्या मंदिर खुली आहे. परंतु, संचारबंदीमुळं मंदिरातील वेळत बदल करण्यात आलाय. तसेच कॅन्टनची सुविधाही भाविकांसाठी बंद राहणार आहे. मंदीर समितीच्या वतीनं सर्व भाविकांना कोव्हिड नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha