Maharashtra News LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Narendra Modi UAE Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी अबूधाबीतील मंदिरात पोहोचले आहेत. अबूधाबीतील हिंदू मंदिराचे आज (दि.14) उद्घाटन होणार आहे. पीएम मोदींच्या हस्ते या मंदिराचे लोकार्पण होईल.
इस्लामिक राष्ट्रातील हिंदूचे हे सर्वांत मोठे मंदिर आहे.
रब्बी हंगामासाठी जायकवाडी धरणातील 2 पाणी पाळ्या मंत्रीगटाच्या कालवा सल्लागार समितीकडून जाहीर करण्यात आल्या मात्र परभणीतील जायकवाडीच्या मायनर 64 या कालव्याला पाणी मिळत नसल्याने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होत आहे त्यामुलर तात्काळ पाणी सोडण्याच्या मागणीसाठी परभणीतील जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता मयुरा जोशी यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेराव घातला.. जायकवाडी पाटबंधारे कार्यालयात आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी ठिय्या देत घेराव घातला..जर तात्काळ पाणी सोडण्यात आले नाही तर संभाजी नगर येथील विभाग कार्यालयात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे..
शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांचे नाव राज्यसभेसाठी निश्चित झाल्याचं समजतेय. एकनात शिंदेंकडून थोड्याच वेळात याबाबात घोषणा करण्यात येईल.
भंडारा जिल्ह्यात उत्पादन होणाऱ्या चिन्नोर तांदळाला भौगोलिक नामांकन म्हणजेच 'जी आय टॅगिंग' प्राप्त व्हावे, यासाठी भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे यांचा मागील दोन वर्षांपासून केंद्र सरकारकडं सातत्यानं पाठपुरावा सुरू होता. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडं त्यांनी केलेल्या प्रयत्नांच्या या पाठपुराव्यामुळं आता जगभर चिन्नोर तांदूळ 'भंडारा चिन्नोर' या नावानं ओळखला जाणार आहे. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे एक जिल्हा एक उत्पादन ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी केंद्राकडून 60 टक्के, तर राज्याकडून 40 टक्के अनुदान मिळणार आहे.
BJP candidate For Rajya sabha : भाजपनं महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी तीन जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना भाजपनं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. भाजपकडून याबाबत आज अधिकृत यादी जाहीर करण्यात आली.
Ratnagiri : शिवसेना (UBT) नेते, आमदार भास्कर जाधव यांना जीवे मारण्याच्या आलेल्या धमक्यांवाबत समर्थक कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी आज पोलीस ठाण्यामध्ये जाऊन डीवायएसपी राजेंद्र राजमाने आणि पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना निवेदन दिले आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली. भास्करराव जाधवांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात राणे पिता पुत्रांचा उल्लेख केलेला आहे.
मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी लातूर जिल्हाभरात बंद पुकारण्यात आला आहे. लातूर शहरातील गंजगोलाई बाजारपेठ सकाळपासूनच बंद. जिल्हाभरात मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला.
मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज लातूरमध्ये मराठा समाजाच्या वतीने बंदच आव्हान करण्यात आल आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील मराठा समन्वयकांनी बंदच आव्हान केल होते. त्यांच्या या आव्हानाला जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय. लातूर जिल्ह्यातील अनेकभागात आज सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात येतोय. त्यात लातूर शहर, लातूर ग्रामीण, औसा ,अहमदपूर ,जळकोट ,देवणी ,उदगीर ,निलंगा ,औराद शहाजानी या भागातून बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आज सकाळपासूनच लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेली गंजगोलाई भागात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवत बंदला पाठिंबा दर्शवला आहे. अनेक शैक्षणिक संकुलांनी विद्यार्थ्यांना दुपारी बाराच्या नंतर सुट्टी दिली आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी आज नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे..सटाणा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांकडून मात्र या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले..या आंदोलनवेळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बाधव उपस्थित होते...
नाशिकच्या लोहोणेर ,ठेंगोडा, सावकी विठेवाडी परीसरातील सकल मराठा समाजाच्यावतीने गिरणा नदीपात्रात १०१ दिवे अर्पण करीत अनोख्या पद्धतीने मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यात आला. सरकारने तातडीने मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे अन्यथा सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा यावेळी देण्यात आला.
आजच्या शेतीसमोर वातावरणातील बदलाचे प्रमुख संकट आहे. कृषी विद्यापीठातून पदवीधर घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी वातावरणीय बदलाच्या संकटाचे संधीमध्ये रूपांतर करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलगुरू तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. डॉ पंजाबराव देशमुख विद्यापीठाच्या 38 व्या दीक्षांत समारंभाला कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.
शासकीय सेवेत काम करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील 3 हजार 187 कर्मचाऱ्यांनी गरिबांना मिळणाऱ्या स्वस्त धान्यावर डल्ला मारला. तर संपूर्ण राज्याचा हाच आकडा 1 लाख 2 हजार पेक्षा जास्त आहे. रेशन कार्ड वरील व्यक्तीचे आधार कार्ड लिंक करण्यात आले असल्याने त्यावरून हा गंभीर प्रकार उघडकीस आला. गरीब कुटुंबांना दोन वेळचे अन्न मिळावे म्हणून शासनाकडून राष्ट्रीय अन्नसुरक्षा , अंतोदय अन्न योजना राबविण्यात जात आहे. यातून लाभार्थी कुटुंबाला दर महिन्याला एका रेशन कार्ड वर 35 किलो धान्य दिले जाते. आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला प्रतिव्यक्ती 5 किलो धान्य दिले जाते. मात्र गरिबांच्या धान्यावर डल्ला मारून या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रवृत्तीचे दर्शन घडविले.
मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचार घेण्याचा आग्रह वाढला आहे, त्यांच्या भेटीसाठी नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज आले असून ते मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती करत आहेत,जरांगे यांचे खाजगी डॉक्टर देखील या ठिकाणी दाखल झालेत. मनोज जरांगे यांचे खासगी तसेच सरकारी डॉक्टर,मित्र सहकारी हे सर्व जण जरांगे यांना उपचचार घेण्याची विनंती करत आहेत.
नितेश राणेंची संजय राऊत मानहानी प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
दंडाधिकारी कोर्टानं सुरू केलेल्या कारवाईविरोधात नितेश राणेंची हायकोर्टात याचिका
भाजप नेते नितेश राणे यांच्या याचिकेवर सुनावणीस हायकोर्टाचा नकार
दुस-या न्यायमूर्तींपुढे दाद मागण्याचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांचे निर्देश
ओबीसीच्या ताटातले आरक्षण टिकणार नाही. ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे. शिंदे आयोगाच विशेष अधिवेशन बोलावलं आहे. लोकसभेच्या आधी एक अधिवेशन घ्याव लागेल. हे फसव राजकारण आहे का? कळत नाही. मनोज जरांगे पाटील यांना आम्ही निरोप दिला आहे, की त्यांना हा लढा शरीराचा त्याग करून लढण्याचा अर्थ नाही. उपोषणावेळी जागृती करायची होती ती केली. महिन्यात लोकसभेच्या निवडणूकीत त्यांनी कुठल्याही पक्षाचा आधार न घेता स्वतःहून जालन्यात स्वतंत्र्य लढाई लढली पाहिजे. गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या कोणासोबत गेले तर लढता येणार नाही. आम्ही आज सूचना पाठवल्या आहेत. त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या अहवालासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे आणखी वेळ मागितला आहे. अहवालाचं काम अजून पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे आणखी दोन ते तीन दिवस वाढवून देण्याची मागासवर्ग आयोगाने विनंती केली.
या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज चर्चा होऊन विशेष अधिवेशन कधी घ्यायचं यावरती शिक्कामोर्त होण्याची आज दाट शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच नवीन चिन्ह मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस इतर पक्षात विलीन होईल या बातम्यांमधे काहीही अर्थ नाही. शरद पवारांचा दरारा इतका आहे की अशा बातम्या पेराव्या लागतायत. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष घरोघरी पोहचलेला आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची तारीख आज ठरण्याची दाट शक्यता आहे. मंत्रीमंडळ बैठकीत यावर चर्चा करुन तारीख ठरवली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्रालयात दाखल झालेत.
मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी. ते जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल, असे वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. आज मराठा समाजाच्या विविध संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याला बारामतीमधूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. बारामतीतील व्यापाऱ्यांनी याला दुपारी बारा वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला. तर बारामती तालुका सहकारी दूध संघातील कामगारांनी दुपारपर्यत कार्यालायचे गेट बंद ठेवून काम बंद आंदोलन केलं. जर सरकारने फसवणूक केली तर लोकसभा निवडणुकीत आम्ही मताच्या स्वरूपातून आमचा सरकार विरोधातरोष व्यक्त करू असे कामगारांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे, शहरातील क्रांती चौकात मराठा समाज बांधवांतर्फे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यावेळी पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये काही बाचा बाची झाल्याचही चित्र पाहायला मिळालं. गेल्या दीड ते दोन तासापासून मराठा समाज बांधव हे क्रांती चौकात घोषणाबाजी करत असून जोरदार निदर्शने करत आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात असून काहीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे मात्र तरीही मराठा समाजातील महिला बांधव त्या घोषणाबाजी करत आहे. काही ठिकाणी पोलिसांनी धरपकड देखील केल्याचं चित्र पाहायला मिळाले.
मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेची कायद्यात अंमलबजावणी करावी या मागणीसाठी अहमदनगर येथील मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आलीये...दरम्यान यावेळी अहमदनगर शहरात मराठा बांधवांच्या वतीने शहरातून रॅली काढण्यात आली...ज्या व्यावसायिकांनी बंद पाळला नाही त्यांना गुलाबाचे फुल देऊन बंद करण्याचे आवाहन करत दुकाने बंद करण्यात आले...तसेच हातात मनोज जरांगेचे पोस्टर घेऊन तसेच कडकडीत बंदचे पोस्टर घेत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
तुळजापूर रेल्वे स्टेशनला गाड्यांचे थांबे सुरू करण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू आहे.. तुळजापूर रेल्वे येथील रेल्वे स्थानकापुढे १९ दिवसांपासुन साखळी उपोषण करण्यात येत आहे. गावात रेल्वे थांबत नसल्याची समस्या गावकऱ्यांनी खासदारांची भेट घेत खासदार रामदास तडस यांच्या पुढे मांडली. लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन खासदार तडस यांनी दिले आहे. रेल्वे थांबे नसल्यान विद्यार्थी, प्रवाशांची अडचण होत आहे.. रेल्वे थांबे सुरू करण्याची मागणीसाठी आंदोलन करण्यात येतं आहे..
भाजपचे घरोघरी चालेल्या कार्यकर्त्यांना विचारा..लोक हळूच म्हणत आहे याला बदला. भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्यावर निशाणा साधला. हातकणंगलेच्या खासदारांनी काय केलं ? आमदार प्रकाश आवाडे यांचा भाषणातून सवाल..
देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार परंतु इथ कोण देणार ? त्यांनी आत्तापर्यंत जनतेला काय ? असा प्रश्न लोक विचारात असल्याचे आवाडे म्हणाले. त्यांच्या भाषणातील व्हिडीओ व्हायरल होतोय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या बातम्यांमधे सत्यता नाही. आम्ही स्वतंत्र चिन्ह घेऊन लढण्याचा तयारीत आहोत. महाविकास आघाडीकडून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून लढणार आहोत, असे अनिल देशमुख म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र राहील. राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होण्यच्या बातम्या तथ्यहीन. या बातम्या कोण पेरतय याचा शोध घ्या. जाणीवपूर्वक या बातम्या पेरल्या जातायत अस वाटते. या बैठकीत महाविकास आघाडीच्या सभेबाबत चर्चा झाली. शरद पवारांच्या सूचनेवरून मी बाईट द्यायला आलोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवीन चिन्हावर निवडणूक लढविण्यास तयार आहे. त्याबद्दल या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रवादी पक्ष इतर कोणत्या पक्षात विलीन होण्याच्या बातम्या या तथ्यहीन आहेत. खोट्या आहेत. ज्यांना शरद पवारांबद्दल आकस आहे ते अशा बातम्या पेरतायत. इंडिया आघाडीची पहिली जाहीर सभा 24 फेब्रुवारीला पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली त्यांना पाठिंबा आणि मराठा आरक्षणासाठी म्हणून आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. परभणी शहरासह सर्व तालुके आणि छोटे-मोठे गावही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महत्त्वाचं म्हणजे काल जिल्हा व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना भेटून बाजारपेठ बंद ठेवण्याचा आवाहनही मराठा संघटनांकडून करण्यात आलं होतं आजही परभणी शहरात विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी फिरत असून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.आज जिल्ह्यात बंद ठेवला जात आहे.
छ. संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात ओबीसी समाजातर्फे मुख्यमंत्र्यांना प्रेम संदेश देण्यासाठी व्हॅलेंटाईन डे निमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्याच ठिकाणी मराठा समाज आक्रमक झालेला आहे; छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या चौकात आहे आणि त्या ठिकाणी व्हॅलेंटाईन डे चा कार्यक्रम कसा होऊ शकतो असा मराठा समाजाचा आक्षेप घेण्यात आलाय.
पोलिसांकडून दोन्ही समाजाला समजावून सांगण्याचं काम सुरू, मात्र दोन्ही समाज आपल्या भूमिकेवर ठाम होते. मनोज जरांगे पाटील आरक्षण साठी लढा देत आहेत आणि हे व्हॅलेंटाईन डे चा कार्यक्रम ठेवत आहेत हे उचित नाही असा देखील मराठा समाजाचा आक्षेप
बुलढाणा जिल्ह्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या अंबावरवा अभयारण्यात काल पर्यटकांच्या जंगल सफारीदरम्यान निवांत बसलेला पट्टेदार वाघ पर्यटकांच्या निदर्शनास पडला. सायंकाळी छत्रपती संभाजीनगर शहरांतील पर्यटकांना वाघाने दर्शन दिले. १५ हजार ८३९.७५ हेक्टर विस्तीर्ण क्षेत्रावर अंबाबरवा अभयारण्य आहे. या अभयारण्यात सहा वाघांसह १४० प्रजातींच्या पक्ष्यांचीही नोंद झाली आहे. काल विविध शहरांतून आलेल्या पर्यटकांना सार्यकाळी वाघाचे दर्शन झाले त्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साह बघायला मिळत आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षण तात्काळ मिळावं यामुळे आज जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात आलाय..बीड शहरांमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.. स्वयंपुरतीने बीड मधील व्यापारी या बंदमध्ये सहभागी झाले असून बीड मधील बस सेवा सुरळीत सुरू आहे तर अत्यावश्यक सेवा देखील सुरळीत सुरू राहाव्यात यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
बंद दरम्यान बीड शहरामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरांमध्ये एक अपर पोलीस अधीक्षक एक उपविभागीय पोलीस अधिकारी चार पोलीस निरीक्षक 25 पोलीस उपनिरीक्षक आणि 150 पोलीस कर्मचारी यांच्यासह बीड मधील राखीव पोलीस दल देखील शहरातील वेगवेगळ्या भागात तैनात करण्यात आले आहेत.
अशोक चव्हाण आल्यानं आमची ताकद वाढली हे खरं आहे. पण थोडं चुकचुकल्या सारखं वाटणार आहे. कारण जे मिळणार होतं ते आता थोडं मिळणार हे तर वाटणारच ना …!! आम्हाला काळजी कऱायची गरज नाहीय आमचा बॅास जे करेल ते योग्यच करेल आमची बार्गेनिंग पॅावर कमी नाही होणार नाही. अशोक चव्हाण यांची परिस्थितीनुसार भूमिका बदलत असते त्यामुळे त्यांनी भुमिका घेतली. आता वायकर, प्रभू, सुनिल शिंदे आणि माजी महापौर यांच्यापैकी कोण येतंय हे दोन दिवसांत कळेल, संजय शिरसट म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत दिरंगाई करणारं हे राज्य सरकार दळभद्री आहे. ते मनोज जरांगेंच्या जीव जाण्याची वाट पाहातायेत. सरकारची ही खेळी आमच्या लक्षात आलीये, त्यामुळं जरांगेंनी उपोषण मागे घ्यावे. असं आवाहन आळंदीतील मराठा बांधवांनी केलीये. जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आळंदी आज बंद ठेवण्यात आलीये. त्यावेळी मराठा समाजाने मनोज जरांगे यांना उपोषण सोडून आपला लढा पुढे सुरू ठेवुयात, अशी विनंती केलीये.
रायगड जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणार्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रातील मंदिरातील गाभारे मूर्तींच्या वज्रलेप या धार्मिक विधीसाठी 18 दिवस बंद राहणार असल्याची माहिती या मंदिराच्या ट्रस्टीनकडून देण्यात आली आहे. मात्र भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता दर्शनासाठी प्रतिमा ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री क्षेत्र हरिहरेश्र्वर मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे.
वज्रलेप विधी व मंदिरातील इतर दुरुस्ती कामे 15 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत असे एकूण 18 दिवस करण्यात येणार आहेत यामध्ये श्री देव हरिहरेश्वर व श्री देव कालभैरव योगेश्वरी या मंदिरांचे गाभारे बंद राहणार असून या कालावधीत भाविकांना प्रत्यक्ष देवांच्या मूर्तींच्या दर्षनाऐवजी केवळ देवांच्या प्रतिमेचे दर्शन घेता येणार आहे.
कामगार आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून कामगारांसाठी किचन सेट आणि कामगार सुरक्षा किटसाठी पेटी वाटपाचा कार्यक्रम भंडाऱ्यात मागील आठवड्यापासून सुरू आहे. ते साहित्य घेण्यासाठी भंडाऱ्यात पोहोचणाऱ्या महिला कामगारांना त्रास सहन करावा लागत असल्यानं आज संतप्त महिला कामगारांनी भंडाऱ्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केलं. महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्यानं राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गावर महिला ठिय्या आंदोलन करण्याकरिता बसल्यानं पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वतीने आज राज्यस्तरीय सोशल मीडिया मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 पासून सायंकाळी 4 पर्यंत हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी दिवसभरात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत.
जातपात धर्म बाजूला ठेवा आणि आता देशाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र या. त्यांच्या योजनेचे रथ गावात येतात ते हुसकावून लावा. त्यावर देशाच्या नावाऐवजी मोदींचे नाव आहे. उद्या हे देशाचे नाव सुद्धा बदलतील, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला
एकट्या उद्धव ठाकरेंना किंमत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे म्हणून ही किंमत आहे. स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला, मात्र त्यांनी ज्या शिफारशी केल्या त्या अंमलात का आणत नाही. दिल्लीच्या सीमेवर देखील प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आलाय. जे देशाची सेवा करण्यासाठी सीमेवर जात आहेत त्यांना आज देशातच अन्नदात्या विरुद्ध उभे केले जात आहे. जन के बात मन की बात असं काहीच नाही शेतकरी फक्त मतासाठी हवा आहे. निवडणूक आल्या की मेरे प्यारे देश वासियो. आणि निवडून आले की फक्त पैशावाल्यांना घेऊन बसणार. भारतरत्न आज बाजार मांडला गेला आहे. ज्यांना दिला त्यांचं योगदान मोठंच.मात्र त्यांनी दिलेल्या शिकवणीवर सरकार चालणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
आता पूर्ण देशात हुकूमशाही विरुद्ध लोकशाही हा लढा होईल. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप केला जातो. आता ज्यांना घेतलं ते सुद्धा घराणेशाहीतूनच आलेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अशोक चव्हाण यांच्या प्रवेशावर टीका केली. अजित पवार सुद्धा घराणेशाहीच प्रोडक्ट असल्याचे ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. गेल्या वेळेसच खासदार निवडून येणार शक्य नव्हतं. मात्र शिवसेनेचा उमेदवार म्हणून ते निवडून आले. आता ते आपल्याला सोडून गेले. आता भाजपच त्यांना उमेदवारी देणार नाही अशी मला माहिती. भाऊसाहेब वाकचौरे देखील गेले होते पण ते पुन्हा आले. वाकचौरे यांनी शिवसेना चोरण्याचा प्रयत्न केला नाही. हा वाकचौरे आणि लोखंडे यांच्यातील फरक आहे, असे उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला.
आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. आम्ही जागेवरच आहोत. आमचं हिंदुत्व देश रक्षण करणार आहे. फेब्रुवारी महिन्यातच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहे. शेतकऱ्यांना कुठलीही मदत या सरकारकडून मिळत नाही. मी मागे सुद्धा दुष्काळात पाहणी शिर्डीत केली. निळवंडे धरणातून पाणी मिळत नसल्याने ही वेळ शेतकऱ्यांवर आली. प्रकल्प झाले की प्रधानमंत्री येतील, असे म्हणत ठाकरेंनी मोदींची नक्कलही केली.
मराठा आरक्षणाचे प्रश्नावरून सकल मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण बीड जिल्हा आज बंद ठेवण्यात आला असून बीड मधील सर्व बाजारपेठे बंद ठेवण्यात आली आहे तर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील जमाबंदीचे आदेश बीडमध्ये लागू करण्यात आले आहेत. म्हणून जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून सरकारने आरक्षणाची घोषणा करून देखील आरक्षणासंदर्भातला कायदा अध्यापही केलेला नाही. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बीड जिल्हा बंद ठेवण्यात आला आहे. या बंद चांगला प्रतिसाद मिळत असून बीड मधील सर्व बाजारपेठ बंद असल्याचं पाहायला मिळत असून पोलिसांचा देखील चूक बंदोबस्त बीड शहरात लावण्यात आला आहे.
आरक्षणाच्या संदर्भात अद्यापही कायदा झालेला नसून सरकारने तात्काळ कायदा करावा अशी मागणी आता सकल मराठा बांधवांच्या वतीने करण्यात येत असून मुंबईमध्ये आंदोलन करून सरकारने ज्या काही घोषणा केल्या होत्या. त्यामध्ये मराठा समाजाची फसवणूक केली आहे, त्यामुळे म्हणून जरांगे पाटील यांनी आपला उपोषण पुन्हा सुरू केला असून त्यांची तब्येत खालावल्याने त्यांनी उपचार घ्यावेत अशी देखील भावना बीड मधील मराठा बांधवांनी व्यक्त केली आहे. तर सरकार वरील रोष आता मराठा समाजामध्ये वाढताना पाहायला मिळत आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तब्येत सांभाळावी, तब्येत सुदृढ राहिली तरंच ते मराठा समाजाच्या (Maratha Samaj) आरक्षणाचा लढा लढू शकतील असा मोलाचा सल्ला राष्ट्रीय ओबीसी महासंघानं (National OBC Federation) दिला आहे. सरकारला राज्य मागास वर्ग आयोगाच्या (State Backward Classes Commission) अहवालावर चर्चा करून विधिमंडळाचा विशेष अधिवेशन बोलावून निर्णय घेण्यासाठी काही कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी पूर्ण करणं आवश्यक आहे. हे सर्व घाईनं होऊ शकत नाही, हेदेखील मनोज जरांगे यांनी लक्षात घ्यावं, असं ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Dr. Babanrao Taywade) म्हणाले.
वारंवार उपोषण केल्यामुळे आणि 27 जानेवारीचा विजयोत्सव साजरा केल्यानंतर, आता पुन्हा उपोषण केल्यामुळे महाराष्ट्रात संभ्रम पसरतोय. नेमकं सुरू काय आहे? नेमकं निर्णय काय होत आहेत? याबद्दल लोकांमध्ये संभ्रम असून हे योग्य नाही, असंही डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले. राज्य मागासवर्ग आयोगामधून चंद्रलाल मेश्राम यांना निष्काशीत करणं योग्य नसून निषेधार्ह आहे. जर कोणी सदस्य सलग तीन बैठकीमध्ये अनुपस्थित राहत असेल, तर आयोगाच्या अध्यक्षांना तसं निष्काशीत करण्याचा अधिकार असतो. मात्र, आयोगाचा एक सदस्य इतर सदस्यांशी सहमत नाही, त्याचे विचार वेगळे आहे, या कारणामुळे त्याला निष्काशीत करणं योग्य नसल्याचं तायवाडे म्हणाले.
ही सभा नसून हा कुटुंबाशी संवाद आहे. भाजपने एवढे प्रयत्न करून सुद्धा त्यांना उद्धव ठाकरे यांना संपवता येत नाहीये. सगळ्या बाजूने घेतलं, शिर्डीच्या खासदाराला देखील फोडलं. आता खासदाराला हे माहीत नाही तिथे एकटेच गेलेत, निष्ठावंत माझ्यासोबतच आहेत. जे गडूळ पाणी कोपरगावात येतंय तेच पाणी या खासदाराला पाजावं लागेल, असा टोला उध्दव ठाकरे यांनी लगावला.
राज्यातील काँग्रेस नेते आमचे म्हणणे ऐकत नाहीत, अनेक वेळा तक्रार करून देखील लक्ष दिले जात नाही, अशोक चव्हाण यांनी निर्णय घेतला पण मी असा काही निर्णय घेणार नाही, असे आमदार हिरामण खोसकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे, खोसकर हे नॉट रीचेबल होते त्यामुळे ते देखील भाजप मध्ये किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होते, मात्र ते केनिया इथे आमदारांच्या अभ्यास दौऱ्यात गेल्याने फोन लागत नव्हता असे सांगितले आहे, आमदारांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायला एखादी मीटिंग देखील घेतली जात नाही, मात्र तिकडे अजित दादा दर मंगळवारी बैठक घेतात, मलाही कॉल करून विचारतात, त्यांनीच मला 200 कोटींचा निधी देखील दिला, असेही खोसकर यांनी सांगितले आहे.
अहमदनगर : मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर शहरासह तालुक्यात बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाजाच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक, अहमदनगर शहरात संमिश्र प्रतिसाद तर कर्जत,पारनेर, जामखेड तालुक्या कडकडीत बंद. अधिसूचनेचा कायद्यात रूपांतर करा, अधिसूचनेप्रमाणे सगे सोयरे देखील कायद्यात समाविष्ट करा या मागणीसाठी शहरासह तालुक्यात पाळण्यात आला बंद...
महाड तालुक्यातील नडगाव येथील चंद्रकांत बळवंत मोरे यांनी 2022 मध्ये महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे एका बनावट कागदपत्र फसवणूक प्रकरणी तक्रार दाखल केली होती. चंद्रकांत मोरे आणि विश्राम पटेल यांच्या संयुक्त मालकीची नडगाव येथे जमीन होती. चंद्रकांत मोरे हे बुरुड समाजाचे असून महाड मधील मोठ्या उद्योजकांनी त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या प्रकरणी सचिन कांतीलाल गुजर, मनजी भानजी पटेल, विश्राम पटेल यांना शुक्रवारी महाड पोलिसांकडून अटक करण्यात आली. याप्रकरणी काल आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून . मुद्रांक विक्रेते दिलीप पवार आणि प्रवीण पटेल अशी आरोपींची नावे आहेत या आरोपींना माणगाव न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. या संपूर्ण गुन्ह्यामध्ये आणखी आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत. आज पाचही आरोपींना माणगाव न्यायालय मध्ये पुन्हा हजर करणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.
Rajya Sabha MP Dhananjay Mahadik : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. अनेक काँग्रेस आमदार आणि नेत्यांचे अशोक चव्हाण यांना फोन करत घेतलेल्या भूमिकेला दिलं समर्थन. पक्षांतर बंदी कायद्यामुळे पक्षाची साथ सोडणं अशक्य असल्याचं मत आमदारांनी व्यक्त केल्याची माहिती मिळाली होती. त्याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनेक काँग्रेस नेते संपर्कात असल्याचं म्हटले होते. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आला. आता भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर काँग्रेसमधील अनेक नेते नाराज असल्याचे वक्तव्य केलेय.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या 5 व्या दिवशी त्यांची प्रकृती काहीशी खालावत असल्याने आंदोलन स्थळी अनेकांना आपले अश्रू आवरता येत नाहीयेत. मनोज जरांगे यांनी उपचार घ्यावेत यासाठी या महिलांकडून जरांगे यांच्याकडे सातत्याने विनंती केली जातेय, त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी.
शरद पवार विरुद्ध अजित पवार याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या ' डिफेक्ट ' यादीत
तांत्रिक त्रुटी आणि कागदपत्रांची पूर्तता करेपर्यंत याचिका डीफेक्ट यादीत असते
सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यावरच याचिकेवर सुनावणी साठी तातडीने विनंती केली जाऊ शकते
याचा अर्थ पवारांकडून अद्याप पूर्तता नाही
डीफेक्ट यादीतील याचिका ९० दिवसांकरिता वैध
९० दिवसांत पूर्तता न केल्यास याचिका फेटाळली जाणार
धाराशिव जिल्ह्यातील दुर्दैवी घटना घडली. येणेगुर गांवात 2 शाळेय लहान मुलांना ट्रकने चिरडलेय. ग्रामस्थांनी रास्ता रोको केलाय. मुंबई हैदराबाद महामार्गावर आंदोलन सुरु
पिंपरी चिंचवडमधील निर्माणाधिन इमारत अचानकपणे झुकली, जी सध्या जेसीबी आणि पोकलेनच्या आधारे उभी आहे. पण आता या इमारतीत अतिरिक्त बांधकाम करण्यात आल्याचं, चुकीच्या पद्धतीने स्ट्रक्चर उभारल्याचं दिसून येतंय. ही डोळेझाक स्थानिकांच्या जीवावर बेतणारी होती. म्हणूनच पालिकेकडून आता चौकशीचा फास आळवला जातोय. चौकशीनंतर आर्किटेक, बिल्डर आणि परवानगी देण्याऱ्या अधिकाऱ्यापैकी नेमकी कोणावर आणि काय कारवाई होणार? की त्यांना अभय दिलं जाणार? अशी चर्चा आहे.
Maharashtra News LIVE Updates: हिंगोली शहरातील बांगर नगर येथील रहिवासी असलेल्या साहेबराव राठोड हे त्यांच्या मुलीचे आणि जावयाचे भांडण सोडवायला गेले असता जावयाने सासऱ्यावरच चाकूने वार केला आहे. यामध्ये साहेबराव राठोड यांच्या बरगाडीला गंभीर दुखापत झाली असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शहरातील साहेबराव राठोड यांची मुलगी आणि गजानन पवार यांचं काही दिवसापूर्वी लग्न झालं होतं परंतु त्यांच्या नेहमीच वाद होत होते. 12 फेब्रुवारी रोजी आरोपी गजानन पवार हा त्यांच्या घरी येऊन मुली सोबत वाद घालत होता. हे वाद सोडवण्यासाठी केलेल्या साहेबराव राठोड यांच्यावरच त्यांच्या जावयाने म्हणजेच गजानन पवार यांनी चाकूने वार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जावई गजानन पवार यांच्या विरोधात वसमत शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra News LIVE Updates: स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत जनतेत कुष्ठरोगाबाबत भीती आणि गैरसमज दूर व्हावे या उद्देशाने आज अमरावती येथे रन फॉर leprosy मॅराथॉन दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या मॅराथॉन दौड स्पर्धेला अमरावतीचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश आसोले यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.. यामध्ये कुष्ठरोग जनजागृती मॅराथॉन दौड स्पर्धेत शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. 30 जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कुष्ठरोग निवारण पंधरवडा साजरा करण्याबाबत केंद्र सरकारने निर्देश जारी केले आहेत. या अनुषंगाने स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत जिल्ह्यात विविध आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीड जिल्हा आज बंद ठेवण्यात आला आहे आणि याचाच परिणाम शाळांवर देखील झाल्याच पाहायला मिळत कारण बीड जिल्हा बंद असल्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थीच न आल्याने शाळेत सुखसुकाट पाहायला मिळत आहे.. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरंगे पाटील यांनी सलाखे अंतरवाली येथे आमरण उपोषण सुरू केला असून या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे आणि त्यांच्याच उपोषणाला समर्थन देण्यासाठी आज बीड जिल्हा बंद ठेवण्याची घोषणा मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे आणि याच बंद चा परिणाम आता शाळेंवर देखील झालेला पाहायला मिळतोय काही विद्यार्थी जरी शाळेत येत असले तरी देखील विद्यार्थी संख्या कमी असल्याने शाळाच भरल्या नसल्याचं चित्र बीडमध्ये पाहायला मिळतय.
मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलनं केली जातायेत. याचाच भाग म्हणून मराठा समाजाने पुण्यातील देवाची आळंदी बंद ची हाक दिली. त्याला आळंदीकरांनी प्रतिसाद दिलाय. वारकऱ्यांची मांदियाळी असणारी अलंकापुरी आज ओस पडलेली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कॅबिनमध्ये शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 5 जणांना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यास अनुसरून मराठा क्रांती मोर्चा कडून बारामती शहर व बारामती तालुक्यात बंद पाळण्यात आलाय. शहरात आज आठवडे बाजार असल्याने व्यापारी महासंघाच्या वतीने दुपारपर्यंत या बंदला पाठिंबा देण्यात येणार असून दुपारनंतर व्यवसाय धारकांनी आपले दुकाने उघडावेत असे आवाहन व्यापारी महासंघाने केलं आहे.. तसेच इंदापूर दौंड पुरंदर मध्ये देखील चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
उद्धव ठाकरे हे दोन दिवस अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे.. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे जनसंवाद मेळाव्याला आज उध्दव ठाकरे संबोधित करत आजच्या दौऱ्याची सुरुवात करतील. आज कोपरगाव , संगमनेर आणि अकोले या तीन विधानसभा मतदारसंघात उध्दव ठाकरे जनसंवाद साधणार आहे.. काळे कोल्हे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरगाव, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर आणि पिचड यांचा मतदारसंघ असलेल्या अकोले या तीन मतदारसंघात आज उद्धव ठाकरे यांचा दौरा असणार आहे.
परभणीच्या पाथरी येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असुन पहिल्या टप्प्यातील विकास कामांसाठी 50 कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी परभणी यांच्या कडे वर्ग करण्यात आला आहे,नियोजन विभागाचे उपसचिव मिलिंद कुलकर्णी यांनी आज हा शासन निर्णय जारी केला आहे.मागच्या अनेक वर्षांपासून साई बाबांची जन्मभूमीं असलेल्या पाथरीचा विकास रखडला होता याबाबत शिर्डी आणि पाथरी मध्ये वाद ही चांगलाच रंगला होता मात्र आता पाथरीतील साई बाबा मंदिर परिसरातील विकास कामांना गती येणार आहे..एकुण 91 कोटी 60 लाख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुर केले होते मात्र निधी मिळत नव्हता अखेर आज याबाबत 50 कोटींचा निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आला असुन याबाबतचा आदेशही जारी करण्यात आला आहे.हा निधी आमच्या पाठपुराव्यामुळेच मिळाला असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते सईद खान यांनी केला आहे..सरकारने निधी दिल्याने साईभक्त व पाथरी वासियात आनंदचे वातावरण निर्माण झाले आहे..
व्हॅलेंटाईन डे म्हटलं की लाल गुलाब आठवतो याच दिवशी लाल गुलाबाची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुलाबाच्या फुलांचे भाव हिंगोलीच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाधारले आहेत. दोनशे ते तीनशे रुपये प्रति किलो इतक्या दराने गुलाबाच्या फुलांची विक्री होती तर पंधरा ते वीस रुपयाला एक गुलाबाचे फुल याप्रमाणे किरकोळ गुलाबाच्या फुलांची विक्री होत आहे आज व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर गुलाबांच्या फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी होत असते आणि त्यामुळेच हिंगोलीच्या बाजारपेठेमध्ये फुलांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळते आहे.
आज वसंत पंचमी आणि व्हॅलेंटाईन डे, आज विठ्ठल रुक्मिणीच्या विवाहाची लगबग सुरू असताना गौतमी पाटील थेट विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी पोचली . जत भागात कार्यक्रमासाठी निघाल्या असताना त्यांनी आधी विठ्ठल दर्शन घेतले . आज व्हॅलेंटाईन डे साठी चाहत्यांना शुभेच्छा देत हे अलीकडे सुरू झाल्याचे सांगितले . आज देवाचा विवाह सोहळा हे माहीत नव्हते असे सांगत किती वाजता असतो याची चौकशी केली .
मनोज जरांगे यांची तब्येत खलावू लागल्याचे निदर्शनास आणता मी एक कलाकार असून मला राजकारणातील काही कळत नाही .. यापूर्वीही मी मनोज जरांगे याना पाठिंबा दिला होता . त्यांची मागणी मान्य होणे गरजेचे असल्याचे गौतमी ने सांगितले .
अकलूज येथे झालेल्या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेची माहितीही नव्हती आणि आमंत्रण देखील नसल्याने गेलो नसल्याचे गौतमी हिने सांगितले .. व्हॅलेंटाईन डे लां दर्षणाबद्दल छेडले असता आपल्या लग्नाचा कोणताही विषय नसल्याचे गौतमी ने सांगितले
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचे परिणाम त्यांच्या शरीरावर दिसत असून उपोषणाच्या 5 व्या दिवशी त्यांच्या नाकातून रक्त येत आहे, त्यांच्या वैद्यकीय निगराणी साठी ठेवलेल्या पथकातील डॉक्टरांना ते तपासणी करू देत नाहीयेत, त्यांची प्रकृती पाहता त्यांना उपचाराची तत्काळ गरज असल्याचे पथकातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.
राज्यसभेसाठी विश्वास पाठक आणि मेधा कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. लवकरच अंतिम निर्णय होणार आहे. आज उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीतून जाहीर होणार
काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत काल झालेल्या बैठकीनंतर आज शरद पवारांनी मोदीबागेत तातडीची बैठक बोलवली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह बहुतांश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. रोहित पवारांची पक्षातील जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच केंद्रीय पातळीवर राष्ट्रवादीचा काही महत्वाचा निर्णय होतो का याकडे लक्ष लागलेयय
महायुतीचा 6 वा उमेदवार द्यायचा की नाही याबाबत सस्पेन्स कायम आहे. जर महायुतीने 6 वा उमेदवार दिला तर मतांची जुळवा जुळव कशी करणार यावरही रात्रीच्या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती दिली. उमेदवार द्यायचा की नाही यावर रात्रीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये अडीच तास बैठक झाली.
सेन्सेक्स ६१३ अंकांनी कोसळला तर निफ्टीत देखील १८५ अंकांची मोठी घसरण
जागतिक बाजारात काल मोठी पडझड झाल्याने भारतीय शेअर बाजारावर देखील त्याचे परिणाम
अमेरीकेतील महागाई दराचे आकडे अपेक्षित नसल्याने शेअर बाजारात घसरण, अमेरीकेतील महागाई वाढल्याने जागतिक बाजारांवर परिणाम
Maharashtra News LIVE Updates: मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होतोय. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी बंदची हाक दिली आहे. आज जालना, बीड, आणि नाशिकमधील अनेक गावांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.
Maharashtra News LIVE Updates: शेतकरी बचत गटाचे पैसे काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचा खामगाव येथील पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापकासोबत शाब्दिक वाद झाला. यातून शेतकऱ्याने सोबत आणलेल्या चाकूने बँक व्यवस्थापकास त्याच्या कार्यालयातच भोसकले. काल सायंकाळी हा धक्कादायक प्रकार घडला ,यावेळी बँकेत धावपळ झाली बँक व्यवस्थापकास वाचवण्यासाठी आलेल्या सहाय्यकाला सुद्धा शेतकऱ्याने जखमी केले आहे. तात्काळ बँक कर्मचाऱ्यांनी बँक व्यवस्थापक यांना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून बँक व्यवस्थापकाची प्रकृती गंभीर आहे. हल्लेखोर शेतकरी किरण गायकवाड याला पोलिसांनी तात्काळ अटक करून रात्री उशिरा त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहे.
Maharashtra News LIVE Updates: पंढरपुरात माघ शुद्ध पंचमी अर्थात वसंत पंचमी दिवशी विठुरायाच्या मंदिरात पारंपारिक पद्धतीने आज विठुराया आणि रुक्मिणी मातेचा स्वर्गीय विवाह सोहळा शेकडो भक्तांच्या उपस्थिती मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. सकाळपासूनच या आगळ्या वेगळ्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे. विठ्ठल मंदिराला विविध प्रकारच्या सुगंधी आणि रंगबिरंगी फुलांनी सजविण्यात आले आहे . आजच्या विवाहसोहळ्यासाठी साक्षात विठुराया आणि रुक्मिणीमातेसाठी पांढरा शुभ्र पोशाख बनवण्यात आला आहे . यावर्षी विठुरायाच्या आंगीवर प्रभू श्रीराम आणि सीता यांचे आकर्षक चित्र दोरे कामात रेखाटण्यात आले आहे .
Maharashtra News LIVE Updates: भंडारा जिल्ह्यात 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान अवकाळी वादळी पावसासह गारपिटीचा जबर तडाखा बसला. मोठ्या प्रमाणात कौलारू घरांचं नुकसान झालं. तसेच शेतशिवारातील रब्बी पिकांसह भाजीपाला व बागायती पिकांचीही हानी झाली. अवकाळीमुळं भंडारा जिल्ह्यातील 142 गावं बाधित होऊन जवळपास 5 हजार 689 शेतकऱ्यांच्या 2 हजार 649 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनानं वर्तविला आहे. नुकसानग्रस्त पिकांमध्ये मका, गहू, हरभरा, जवस, वाटाणा, भाजीपाला, लाख, लाखोरी आदी पिकांचा समावेश आहे. सर्वेक्षणाचं काम वेगानं सुरू असून नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Maharashtra News LIVE Updates: राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांना आयोगातुन वगळण्यात आलय. आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश संदीप शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आलाय. मराठा आरक्षणाबाबत मेश्राम यांनी संदीप शुक्रे यांच्या भुमिका पेक्षा वेगळी भुमिकी घेतल्याने त्यांची हकालपट्टी झाल्याची चर्चाय. मात्र अद्याप आपल्याला आपली हकालपट्टी झाल्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही अस मेश्राम यांनी म्हटलय. राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यभरात करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणानंतर अहवाल सादर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
Maharashtra News LIVE Updates: माजी आयपीएस अधिकारी आणि एमपीएससीचे माजी सदस्य प्रताप दिघावकर यांनी भाजपामधे काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपसथितीमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजपकडून त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू झाल्याची चर्चा आहे..धुळ्यात भाजपच्या उमेदवारीसाठी दिघावकरांनी मतदार संघाचा दौरा, गाठीभेटींवर भर देणे सुरु ठेवले आहे. इच्छुक व त्यांच्या समर्थकांकडून ठिकठिकाणी फलकबाजी करुन वातावरण निर्मिती केली जात आहे..दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धुळे मतदार संघात भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा असताना भाजपाचे वरिष्ठ काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.
Maharashtra News LIVE Updates: शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट दाखवणारे जाणता राजा हे महानाट्य आजपासून पुढील दोन दिवस हिंगोली शहरांमध्ये दाखवले जाणार आहे 14 15 आणि 16 फेब्रुवारी या दिवशी दररोज सायंकाळी सहा वाजता हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर या महानाट्याचा सादरीकरण केले जाणार आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित आणि दिग्दर्शित जाणता राजा हे आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचे महानाट्य आहे, हे आज पासून हिंगोली शहरात दाखवले जाणार आहे. या महानाटकासाठी 8000 नागरिकांच्या आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे. खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, हे महानाट्य यापूर्वी कर्नाटक मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात राजस्थान अशा विविध ठिकाणी मराठी हिंदी भाषेमध्ये सादरीकरण करण्यात आले आहे. या महानाट्यामध्ये दीडशे कलाकार सहभागी राहणार आहेत. या महानाटकासाठी हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर 8200 प्रेक्षकांशी असं व्यवस्था करण्यात आली असून 220 व्हीआयपी 2000 व्हीआयपी आणि सहा हजार जनरल असे नागरिकांचे असन क्षमता तयार करण्यात आली आहे.
Maharashtra News LIVE Updates:केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर, देशभरात गाजलेल्या भंडारा इथल्या तीन सख्ख्या बहिणींच्या हत्या प्रकरणात दहा वर्षांचा कालावधी लोटला असताना आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. हे तिहेरी हत्याकांड अंधश्रद्धेतून घडल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला असून आरोपींना तात्काळ अटक करून न्याय द्यावा, अशी मागणी आता पुन्हा एकदा कुटुंबियांनी केली आहे.
Maharashtra News LIVE Updates: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. इगतपुरी, सिन्नर व नाशिक शहरात घेणार शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ' संवाद मेळावा ' आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यातून ठाकरे लोकसभा निवडणुक प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. शिवसेनेच्या ( उद्धव ठाकरे गट ) कार्यकर्त्यांत उत्साह.
Maharashtra News LIVE Updates: यवतमाळ पांढरकवडा येथील टोल नाक्यावर ट्रकमध्ये भरुन नेण्यात येत असलेली 27 लाख रुपये किमतीची निकृष्ठ दर्जाची सुपारी जप्त करण्यात आली. कर्नाटक येथून निकृष्ठ दर्जाची सुपारी आरजे 04जीसी 4478 क्रमांकाच्या ट्रकमधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरुन दिल्ली येथे नेण्यात येत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या दक्षता पथकाला मिळाली. मिळालेल्या गोपनीय माहिती वरून टोल नाक्यावर सापळा रचून या ट्रकची तपासणी केली असता यात 24 हजार 498 किलो सुपारी सुमारे 27 लाख रुपये किमतीची आढळुन आली. अन्न सुरक्षा व मानदे कायदा, 2006 अन्वये या साठ्यातील नमुना घेवून उर्वरित माल जप्त जप्त करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त जयपुररकर, सहायक आयुक्त (दक्षता) आनंद महाजन, सहायक आयुक्त गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम दंदे व संदीप सूर्यवंशी अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) यांनी केली.
Maharashtra News LIVE Updates: अंधश्रद्धा निर्मूलन समितचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयच्या वकिलांकडून पुण्यातील विशेष न्यायालयात अंतिम युक्तिवाद सुरु करण्यात आलाय. सी बी आय चे वकील येत्या शनावारी त्यांचा अंतिम युक्तिवाद करणार असून त्यानंतर बचाव पक्षाचे वकील त्यांचा युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर विशेष न्यायालय या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींन शिक्षा सुनावणार आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची वीस ऑगस्ट 2013 साली पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या करण्यात आली होती. सी बी आय ने या प्रकरणात सनातन संस्थेच्या डॉक्टर विरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर , संजीव पन्नासेक, विक्रम भावे यांना अटक केली. न्यायालयाने या आरोपींना दोषी ठरवले असून त्यांना शिक्षा काय द्यायची यावर युक्तिवाद सुरु आहे.
Maharashtra News LIVE Updates: अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करीत मालेगावच्या वऱ्हाणे शिवारातून रंग लावलेल्या सुपारीच्या अवैध वाहतूक करणाऱ्या ११ ट्रकसह ३ कोटी ८४ लाख रुपये किंमतीचा २५२.३ टन भेसळयुक्त रंग लावलेल्या सुपारीचा साठा जप्त करण्यात आला..कर्नाटकातुन दिल्ली येथे रंग लावलेली सुपारीची अवैध वाहतुक ट्रकमधुन होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच अन्न आणि औषध प्रशासनाने शोध घेतला असता मालेगावच्या वऱ्हाणे शिवारात एका हॉटेलच्या मागे रंग लावलेली सुपारीची अवैध वाहतुक करणारे तब्ब्ल ११ ट्रक हॉटेलल्या मागे छुप्या पध्दतीने लावलेले आढळून आले.. वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये किटकांच्या प्रादुर्भावाने खराब झालेली व ते लपविण्यासाठी रंग लावलेल्या भेसळयुक्त सुपारी आढळून आली..सुपारीचे एकुण ११ नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहे.अन्न व औषध प्रशासन पुढील तपास करीत आहे..
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -