Maharashtra Rain News : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे. तर काह भागात अद्याप चांगला पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, आज राज्याच नेमकी काय परिस्थिती असले याबबातची माहिती हवामान विभागानं (IMD) दिली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट (Yellow alert) देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
दरम्यान, मागील तीन चार दिवसात राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळालं. दरम्यान या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क आहे. प्रशासनाने सगळी तयारी देखील केली आहे. दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झालाय, त्या भागात शेती कामांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.
कोकणासह मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता कमी
हवमान विभागानं दिलेल्या माहितीनुसार कोकणासह मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता कमी आहे. काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. कोकणात फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, हा भाग सोडता संपूर्ण महाराष्ट्रात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.
विदर्भात मान्सूनच्या प्रगतीला ब्रेक
सध्या मान्सूनने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापला आहे. तर विदर्भाच्या काही भागात म्हणजे पश्चिम विदर्भाच मान्सून सक्रिय झाला आहे. मात्र, अद्याप मान्सूनने संपूर्ण विदर्भ व्यापला नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. विदर्भात मान्सूनच्या प्रगतीला सध्या ब्रेक लागला आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसात मान्सून संपूर्ण विदर्भात सक्रिय होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये
दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेती कामांना वेग आला आहे. शतकरी खरीपाची पेरणी करत आहे. मात्र, ज्या भागात चांगला पाऊस झाला नाही, त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान, जोपर्यंत 100 मिलीमीटर पावसाची नोंद होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या: