Maharashtra Rain Update : राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र दिसून येत आहे. तर आजपासून पुढचे तीन दिवस विदर्भातील (Vidarbha Weather Update) सर्वच्या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आला आहे. अशातच गेल्या कित्येक दिवसांपासून दांडी मारून बसलेल्या वरुणराजाने अखेर विदर्भातील (Vidarbha Weather Update) बहुतांश जिल्ह्यांना अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. तर मागील दोन दिवसांपासून विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे (Heavy Rain) सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळाले. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला देखील बसला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांवर दुबार ते तिसऱ्यांदा पेरण्या करण्याचे संकट ओढवले आहे.


आमदार अमोल मिटकरींच्या गावचा संपर्क तुटला


अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. परिणामी या पावसाचा फटका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गावाला देखील बसला असून गावचा संपर्क तुटला आहे. काल रात्री आणि आज पहाटेच्या कुटासा परिसरात धुवाधार पाऊस झाला. त्यामुळ अकोला आणि कुटासा गावाला जोडणारा रस्ता बंद झाला आहे. या रस्त्यावरील लवकी नाल्याला पुर आल्याने कुटासा गावचा संपर्क तुटला आहे. कुटासा हे गाव आमदार अमोल मिटकरींचं गाव आहे. या नाल्याला आलेल्या पूरामूळ शेतकऱ्यांच्या शेत जमिनी पाण्याखाली गेल्या आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ही यात झालंय.आज सकाळी वाहतूक सुमारे काही तासांसाठी प्रभावित झाली होती. मात्र आता काहिस नाल्याचं पाणी कमी झालेय. पुढील दीड तासात रस्ता खुला होण्याची शक्यता आहे.


शेतातील पिके खरडुन गेल्याने शेतकरी संकटत


विशेष म्हणजे कुटासा परिसरात 15 दिवसांपूर्वी पेरणी झाली होती. मात्र काल संध्याकाळी झालेल्या धुवाधार पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचले आहे. शेत जमीन पाण्याखाली गेल्याने शेतातील पिके खरडुन गेल्याने शेतकरी संकटत सापडले आहेत. दरम्यान कुटासा रस्त्यावरील लवकी नाल्यावरील पुलावर उंची कमी असल्याने हा पुल पाण्याखाली जाऊन या रस्त्यावरील वाहतूक दरवर्षी प्रभावीत होते. त्यामुळ या पुलाची उंची वाढवण्यात यावी, लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घ्यावा. अशी मागणी येथील ग्रामस्थांकडुन केली जात आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या