मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, धारशिवसह कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे.कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान मागच्या दोन-तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट जारी केला आहे. तर रायगड, ठाणे या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याल रेड अलर्ट देण्यात आला आहे.
आजही राज्यभरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट जारी केला आहे.नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपी संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्याला यलो अलरर्ट दिला असून काही ठिकाणी तुरळक पवासाची शक्यता आहे. तर पुणे, साताऱ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.अहमदनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रायगड, ठाणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट
कोल्हापुरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्याता आहे. सोलापुरमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. सखल भागात पाणी साचलं, काही ठिकाणी घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ झाली.
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई
पहिल्याच पावसाचा जोर पाहता नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दादरमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे. पूर्व उपनगरातही पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या मरीन ड्राईव्ह परिसरात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मुंबईत काही ठिकाणी ढगाळ वातावरण काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाअभावी शेतीची काम खोळंबली होती. त्या कामांना आता वेग आला आला आहे. दरम्यान, 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये असा सल्ला काही कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
हे ही वाचा:
शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी? पेरणीसाठी योग्य पाऊस झालाय का? तज्ज्ञांनी काय दिला सल्ला…