बीड : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे कट्टर समर्थकाच्या (Supporter) नावाने फेक सोशल मीडिया अकाऊंट (Fake Socail Media Account Post) काढून त्यावरून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली. फेक अकाऊंटवरील अज्ञात व्यक्तीच्या पोस्ट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मिक कराड यांच्या नावाने फेक अकाउंट काढून सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करण्यात आली. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


धनंजय मुंडेंच्या कट्टर समर्थकाच्या नावाने फेक अकाऊंट


बीड लोकसभा निवडणुकीतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे सोशल मीडियाच्या वादग्रस्त पोस्टमुळे जातीय तेढ निर्माण झाला असतानाच, आता धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मीक कराड यांच्या नावे इंस्टाग्राम वर बनावट अकाउंट काढून त्यावर वादग्रस्त पोस्ट टाकण्यात आली आहे. याप्रकरणी परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल


परळी नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते वाल्मीक कराड यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे की, समाजात विष पेरण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न कोणीतरी करत आहे. सदर इंस्टाग्राम अकाउंटशी आपला कोणताही संबंध नसून केवळ खोटे अकाउंट काढून दोन समाजात तेढ निर्माण होईल, असा प्रयत्न करणाऱ्यावर वेळीच कारवाई करण्याची मागणी सुद्धा वाल्मीक कराड यांनी केली आहे.