Agriculture News : राज्याच्या सर्वच भागात हळूहळू मान्सून (Monsoon) सक्रिय होत आहे. कोकणानंतर मान्सून आता मुंबईत (Mumbai) दाखल झाला आहे. 15 जूनपर्यंत राज्याच्या सर्व भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळं या काळात शेतकऱ्यांनी (Farmers) पेरणी (Sowing) करणं योग्य होईल का? असा सवाल उपस्थित केला जातोय. याबाबत हवामान अभ्यासक आणि शेती प्रश्नाचे अभ्यासक माणिकराव खुळे यांनी माहिती दिली आहे. शेतकऱ्यांनी खात्रीच्या ओलीवरच व सिंचनाची काही सोय असेल अश्याच ठिकाणी स्वतःच्या निर्णयावरच पेरणीचे धाडस 20 जून दरम्यान करावे, असा सल्ला माणिकराव खुळे यांनी दिला आहे. ते नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात.  


 20 जून दरम्यान शेतकऱ्यांनी पेरणी करावी


महाराष्ट्रात 15 जूनपर्यंत जो काही पाऊस होईल, त्या ओलीवरच चांगल्या प्रतीच्या जमिनीत व जिथे 10 से. मी.चांगली ओल साध्य झाली असेल म्हणजे पेर-उतार नंतर पीक रोप 30 ते 40 दिवस दम धरेल अशाच खात्रीच्या ठिकाणी, 20 जून दरम्यान पेरणी होवु शकते, असे माणिकराव खुळे म्हणाले. त्यामुळं शेतकऱ्यांनी खात्रीच्या ओलीवरच व सिंचनाची काही सोय असेल अशाच ठिकाणी स्वतःच्या निर्णयावरच पेरणीचे धाडस 20 जून दरम्यान करावे. कारण 15 जूननंतर कदाचित पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. म्हणून फार सावधगिरीने, संयमाने पेरणीचे पाऊल टाकावे असे माणिकराव खुळे म्हणाले.


शेती कामांना वेग


पावसाअभावी शेतीची काम खोळंबली होती. त्या कामांना आता वेग आला आला आहे. दरम्यान, 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये असा सल्ला काही कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे. अनेक भागांमध्ये पाऊस जरी होत असला तरीसुद्धा 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय कुठेही शेतकर्‍यांनी पेरणी करु नये. पेरणीची घाई करु नये असे कृषी तज्ज्ञांनी सांगितलं आहे. जोपर्यंत शेतामध्ये तीन ते चार इंच ओल निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणी करणे हे धोकादायक ठरु शकते. दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर येऊ शकतं, जे आज परवडणार नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी आत्ताच पेरणीची घाई करु नये. चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असं सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.


 महत्वाच्या बातम्या:


10 ते 14 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार, पुढील चार दिवस 'या' भागात मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज