Maharashtra Rain LIVE : राज्यात पावसाचं धुमशान सुरुच, पाहा ठिकठिकाणचं अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Rain :  राज्यात सततच्या पावसाचं धुमशान सुरुच आहे. आतापर्यंत पावसामुळं राज्यातील विविध भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Jul 2022 05:03 PM
Nagpur : विद्यूत टावरवर चार दिवसांपासून माकड अडकले

नागपूरः हिंगणा तालुक्यातील माहुरझरी परिसरातीस एका हाय टेंशनलाईन विद्यूत टावरवर चार माकड गेल्या गुरुवार ते शुक्रवारपासून अडकल्याची घटना पुढे आली आहे. टावरच्या खाली असलेल्या भागात गवत आणि पाला पाचोळा असल्याने ते खाऊन परत टावरवर चढत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

Nagpur Rains : सोमवारीही संततधार, पावसाचा जोर मात्र नरमला

नागपूरः गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसाने रविवारी दिवसभर उसंत घेतल्यानंतर रविवारी रात्री मात्र शहराला चांगलेच झोडपले. मात्र सोमवारी सकाळपासून पुन्हा थोड्या थोड्या वेळाच्या विश्रांतीनगर पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र रविवारच्या तुलनेत पावसाचा जोर नरमल्याचे दिसून आले. महानगरपालिकेने नियोजन केले नसल्याने शहरातील रस्ते जलमय झाले तर अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसले.

Wardha Rain : वर्धा जिल्ह्यात 24 तासांमध्ये 136 मि.मी. सरासरी पाऊस

Wardha Rain : राज्यात वर्धा जिल्ह्यात 24 तासांमध्ये 136  मि.मी. सरासरी पाऊस झाला.जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याचे माहिती मिळाली आहे.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रामधील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, आजची परीक्षा रद्द

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रामधील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे आज दुपारी 2 वाजता होणारी परीक्षा रद्द.. आज होणारी परीक्षा 20 तारखेला होईल.. विद्यापीठानं म्हटलं आहे की, सर्व संबंधितांचे माहितीकरिता सूचित करण्यात येते की संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रामधील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेकरीता संबंधित परीक्षा केंद्रावर पोहोचणे शक्य होणार नाही. या स्थितीचा विचार करता आज सोमवार दिनांक 18/7/2022 रोजी दुपारी  2 ते 05.45 या कालावधीत होणारी पर्यावरण अभ्यासक्रम विषयाची परीक्षा रद्द करण्यात येत आहे. सदर विषयाची परीक्षा बुधवार दिनांक 20/07/2022 रोजी दुपारी 02 ते 05.45 या वेळेत संबंधित महाविद्यालयांमध्ये होईल. महाविद्यालयांनी  उपरोक्त वेळापत्रकातील बदलाची माहिती सर्व संबंधित विद्यार्थ्यांना तातडीने द्यावी, ही विनंती. तसेच महाविद्यालयांना या विषयाचे प्राप्त झालेले प्रश्नपत्रिकेचे पॅकेट सुरक्षित ठेवावे जेणेकरून प्रश्नपत्रिकेची गोपनीयता बाध्य होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी, सदर प्रश्नपत्रिका दिनांक 20/7/2022 रोजी दुपारी 02.ते 5.45 या वेळेमध्ये प्रत्येक महाविद्यालयामध्ये महाविद्यालयीन स्तरावरच नियोजित राहील 


 

इंदोर - अमळनेर बस अपघातात 13 मृतदेह नदीतून काढण्यात आले

मुंबई, : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदोर- अमळनेर बस अपघातात 13 मृतदेह नदीतून काढण्यात आले असून यामध्ये 8 पुरूष, 4 स्त्रिया व एका बालकाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन यांचे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अपघातस्थळी मदत व बचाव कार्य सुरू आहे.


एसटी महामंडळाकडून प्राप्त माहितीनुसार 1.चेतनचे वडील राम गोपाल जांगिड़, राहणार नांगल कला गोविंदगढ, जयपूर, राजस्थान,2.जगन्नाथ यांचे वडील हेमराज जोशी, वय 70 वर्ष, निवासी मल्हारगढ़ उदयपूर राजस्थान, 3. प्रकाश यांचे वडील श्रवण चौधरी वय 40 वर्षे, राहणार शारदा कॉलनी, अमळनेर, जळगाव, महाराष्ट्र, 4. निबाजी यांचे वडील आनंदा पाटील, वय 60 वर्ष राहणार पीलोदा अमळनेर, 5.कमला बाई यांचे पती नीबाजी पाटील वय 55 वर्षे राहणार सी. पिलोदा अमळनेर, जळगाव 6. चंद्रकांत यांचे वडील एकनाथ पाटील वय 45 वर्षे राहणार अमळनेर, जळगाव, (उपरोक्त 1 से 6 पर्यंतचे मृतकांची ओळख आधारकार्डद्वारे केलेली आहे, 7. श्रीमती अरवा यांचे पती मुर्तजा बोरा, वय 27 वर्षे राहणार मूर्तिजापूर, अकोला यांची नातेवाईकांद्वारे ओळख पटलेली, 8.सैफुद्दीन यांचे वडील अब्बास निवासी नूरानी नगर, इंदौर यांची नातेवाईकांद्वारे ओळख पटलेली आहे तसेच मृतांमध्ये बसच्या चालक व वाहकाचाही समावेश आहे.


याशिवाय अद्याप पाच मृतदेहांची ओळख पटायची बाकी आहे.अपघातग्रस्त बस नदीतून बाहेर काढण्यात आली असून, अपघातात अद्याप किती लोक असतील याची माहिती मिळालेली नाही. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एसटीमहामंडळाकडून दहा लाख रूपये मदत देण्यात येणार असून रूग्णालयात उपचारासाठी दाखल जखमींवर उपचारही एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहेत. सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केला आहे. एसटी महामंडळाकडून दुपारी दीड वाजता सदर माहिती देण्यात आली आहे.


अपघातस्थळी बचाव कार्य सुरू


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अमळनेर आगाराची इंदोर- अमळनेर बस क्रमांक एम एच 40 एन 9848 ही आज दि. 18 जुलै, 2022 रोजी सकाळी 07.30 वा. इंदोर येथून अमळनेरकडे मार्गस्थ झाली. सकाळी सुमारे 10.00 ते 10.15 च्या दरम्यान मध्यप्रदेशमधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीच्या पूलावर सदर बस अपघातग्रस्त होऊन नर्मदा नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


घटनास्थळी खरगोन व धारचे जिल्हा प्रशासन पोहोचले असून बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती घेण्याचे काम सुरु आहे. आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात असून अपघातग्रस्त व्यक्तींना सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळी मदतीसाठी 09555899091, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 0257- 2223180, 0257- 2217193 हे क्रमांक जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रसिध्द केले आहेत, अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून दुपारी दोनच्या सुमारास मिळाली आहे.

Nashik : गोदावरी नदीला पूर आल्यानंतर आता चारही बाजूंना चिखलाचे साम्राज्य; महापालिकेकडून प्रयत्न सुरु

Nashik : नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेला पूर एकीकडे ओसरत चाललेला असतानाच दुसरीकडे गोदातीरावर आता चिखलाचे आणि कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. लक्ष्मण कुंडाजवळ हा सर्व चिखल काढण्याचे आणि स्वच्छतेचे काम महापालिकेकडून युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने गंगापूर धरणातून पाण्याच्या विसर्गातही वाढ करण्यात आली होती. यामुळे गोदावरीला पूर आला होता, गोदापात्रावरील रामसेतू तसेच अनेक छोटे मंदिरं पाण्याखाली गेली होती. पुराची ओळख म्हणून समजला जाणारा दुतोंड्या मारुतीही दिसेनासा झाला होता. मात्र, आता पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने गंगापूर धरणातून केल्या जाणाऱ्या विसर्गातही घट करण्यात आल्याने पुराचे पाणी ओसरत तर चालले आहे. मात्र, पुरासोबत वाहून आलेला कचरा, पानवेल्या यामुळे गोदातीरावर दुर्गंधी पसरण्यासोबतच चिखलही मोठ्या प्रमाणात साचला आहे.

Aurangabad: जायकवाडी धरणाची आवक घटली; पाणीसाठा 73 टक्के

Aurangabad News: पावसाने विश्रांती घेतल्याने जायकवाडी धरणात येणारी पाण्याची आवक घटली आहे. आज सकाळपासून 45 हजार क्युसेकची सुरु असलेली आवक आता 34 हजार 482 झाली आहे. धरणात आता 73.58 टक्के पाणीसाठा असून, जिवंत पाणीसाठा 1597.349 दलघमी एवढा झाला आहे. नशिक धरणातून विसर्ग करण्यात येत असलेल्या पाण्याचा वेग कमी झाल्याने जायकवाडीची आवक सुद्धा घटली आहे.

हिंगणघाट येथे अतिवृष्टीमुळे पुराचा वेढा, नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी स्थानिक प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न
देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, हिंगणघाट येथे अतिवृष्टीमुळे पुराचा वेढा पडून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी स्थानिक प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. वर्धा जिल्हाधिकारी यांच्याशी मी चर्चा केली आहे. SDRF टीम तेथे पोहोचली असून NDRF ची टीम सुद्धा रवाना झाली आहे. #MaharashtraRains #Wardha



Yavatmal Rain News :  यवतमाळ बेंबळा प्रकल्पाचे 18 दरवाजे उघडले

यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे प्रकल्पाच्या जलाशय पातळीत वाढ होत आहे. जलाशय पातळी नियंत्रणात  ठेवण्याकरीता व धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने जलाशयामध्ये येणाऱ्या  प्रमाणात नदी पात्रात धरणाचे एकूण 18 दरवाजे  50 सेमीने उघडून  900 घनसेमी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.  नदीच्या दोन्ही तिरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्याबाबत व खबरदारी घेण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे.

Yavatmal Rain News : झाडगाव गावातील शंभरावरील घरात शिरले पुराचे पाणी

  रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे  राळेगाव तालुक्यातील झाडगाव या गावातील शंभरावरील घरामध्ये पुराचे पाणी शिरले आहे. झाडगाव जवळ नंदिनी नदीवर वरुड या गावाजवळ लघु प्रकल्प आहेत. रात्रीपासून सुरू असलेल्या पाण्यामुळे या प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्याने ओव्हर फ्लो होऊन  यातील पाणी झाडगाव या गावांमध्ये जाऊन जवळपास शंभरावर घरात हे पाणी शिरले आहे. राळेगाव उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी सर्व नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्वांना हलविण्यात आले असून त्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. या पुरामुळे नागरिकांच्या गरांची अन्नधान्य इतर साहित्याची मोठे नुकसान झाले आहे.

Amravati Rain : सावरखेड गावात अनेकांचा घरात पाणी शिरले...

Amravati Rain :  भतकुली तालुक्यातील सावरखेड गावात पुराचं पाणी शिरल्याने निन्मपेढी धरणाच्या पेढी नदीकाठच्या सावरखेड या गावाची पूर सरंक्षण भिंत पाटबंधारे विभागाने गावातील पाणी नदीपात्रात जाण्यासाठी दोन ठिकाणी खोदून ठेवली आहे.. जे पाईप टाकले ते बुजविण्यात आले नाही त्यामुळे तिथून गावामध्ये पाणी घुसत आहे.. 


पूर सरंक्षण भिंत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली पण मागणी पूर्ण न झाल्याने आज गावात कमरे एवढं पाणी आहे..

Akola Rains Live :  अकोल्यातील बाळापूर शहराला पुराचा वेढा; तालुक्याचा अनेक गावांशी संपर्क तुटला

Akola Rains Live : अकोला जिल्ह्यातील अनेक भागात काल सायंकाळ पासून सुरू असलेल्या   पावसामुळे  अकोल्यातील बाळापूर शहरातील मन नदीला आलेल्या पुरामुळे बाळापूर शहराला पुराने वेढा घातला असुन अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.  मन नदीचा पूलावरुन पाणी वाहत आहे.हा पुर पाहण्यासाठी शहरातील नागरीकांनी एकच गर्दी केली आहे .यापुरामुळे बाळापूर शहारातील सर्व महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहे. पुलावरुन जात असलेल्या पावसाने एस.टी.बस सुध्दा बंद आहे.तसेच शहरातील नागरीकांचा रस्ता सुध्दा बंद झला आहे.हा पुर पाहण्यासाठी नगरीकांची गर्दी उसळली होती.

Nashik Rain : नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचे 'टाइम प्लिज', मात्र वातावरण ढगाळ 

Nashik Rain : सलग दहा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्यात उसंत घेतली असून अधून मधून तुरळक पावसाच्या सरी कोसळतं आहेत. तसेच वातावरण ढगाळ असून  हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहरासह जिल्ह्यात तुरळक पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान पावसाने ब्रेक घेतल्याने धरणांतून विसर्गही घटविण्यात आला आहे. 

 Sangli Chandoli Dam : आठ दिवसांच्या सलगच्या अतिवृष्टीने चांदोली धरण 23 टीएमसीहून अधिक भरले, धरणाचा जलविद्युत प्रकल्प देखील सुरू
 Sangli Chandoli Dam :  दोली धरण परिसरामध्ये आठ दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे चांदोली धरण 65  टक्केहून अधिक  भरले आहे. एकूण 33 टीएमसीचे असलेले हे धरण आतापर्यंत 23 टीएमसीहून अधिक भरले आहे. आठ दिवसांतल्या सलगच्या पावसाने धरण 65 टक्केहुन अधिक भरले आहे. यामुळे चांदोली धरण मधील जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यात आलाय.  दुसरीकडे चांदोली धरणातील पात्र परिसरातील डोंगरातील धबधबे देखील प्रवाहीत झालेत. यंदा पाच जुलैपासून पावसाला सुरुवात झाली आणि  त्यावेळेपासून चांदोली धरण क्षेत्रात  सलग अतिवृष्टी होत आहे.  मुसळधार पावसाने धरणातील पाणीसाठ्यात आठवड्याभरात प्रचंड पाणीसाठा वाढलाय. 
Yavatmal Rain: अडान नदीला पूर, यवतमाळ ते दारव्हा मार्ग बंद





यवतमाळ जिल्ह्यात काल रात्री पासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे बोरीअरब येथून वाहणाऱ्या अडाण नदीला पूर आला. त्यामुळे बोरी अरब जवळच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे यवतमाळ ते दारव्हा मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली.  या दरम्यान संभाव्य धोका लक्षात घेता त्या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. पावसामुळे शाळा ही बंद आहे.


 

 



 


Gadchiroli Rain Update : भामरागड शहरात शिरलेल्या पुराचं पाणी देखील ओसरलं

गडचिरोली: जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे..तर भामरागड शहरात शिरलेल्या पुराचं पाणी देखील ओसरलं असून पर्लकोटा नदीच्या पूलावर तोड्या प्रमाणात पाणी असून दुपारपर्यंत आलापल्ली-भामरागड मार्ग देखील वाहतुकीसाठी मोकळा होण्याची शक्यता..

नांदेड:अतिवृष्टीची पाहणी करण्यास गेलेल्या आमदारावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सरबत्ती,गावकऱ्यांनी घेराव घालून आमदाराला धरले धारेवर.

अधिकाऱ्यांना,कर्मचाऱ्यांना धारेवर धरताना आपण अनेक वेळा पाहिले आणि ऐकले असेल.पण आमदारांनाच कुणी धारेवर धरले असेल यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण तसं घडलंय नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे.देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर हे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यास गेले असता आमदार महोदयांना शेतकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती करत चक्क धारेवर धरल्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्याच झालं असं की, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यास आमदार महोदय देगलूर तालुक्यातील एका गावात पोहचले. त्यावेळी गावकऱ्यांनी आमदारास घेराव घालून गावातील समस्यांचा पाढा त्यांच्या समोर वाचला.एवढेच नाही तर गावातील डी. पी. संदर्भात फोन केला असता आमदार फोन ही घेत नाहीत व आमच्या समस्या ऐकूनही घेत नाहीत. दरम्यान अनेक समस्यांनी नागरिक हैराण असताना, आठ महिन्यानंतर आज आपणास आमची आठवण आली का असा प्रश्न ही गावकऱ्यांनी विचारला.या प्रश्नांच्या सरबत्तीने पुरती गाळण झालेल्या आमदारांची नंतर कार्यकर्त्यांनी सारवा सारव करत,त्या ठिकाणाहून काढता पाय घेतलाय.दरम्यान या व्हायरल व्हीडिओची चर्चा मात्र जिल्हाभरात सुरू आहे.

Nanded Rains : नांदेडकरांची तहान भागवणारा डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प 71% क्षमतेने भरला

Nanded Rains: पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.  बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा एक दरवाजा रात्री मध्यरात्री 12:15वाजता उघडण्यात आला आहे.  यातून 351 क्यूमेक (12395.00 क्यूसेक ) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील मालमत्तेची, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य,  इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Wardha Rains: रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निम्न वर्धाचे सर्व 31 दरवाजे उघडले

Wardha Rains: रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निम्न वर्धाचे सर्व 31 दरवाजे उघडले, अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी तर पुलावर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक बंद काही गावांचा संपर्क तुटला तर धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाचे सर्व ३१ दरवाजे आज १८ जुलै रोजी सकाळी ६.१५ वाजता १०० सेमीने उघडण्यात आले आहे. प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान सुरु आहे. त्यामुळे सद्यस्थितीत प्रकल्पातून १६२५.१३ घन.मी/से.पाणी विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नदी पात्राच्या दोनही काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

Sindhudurg Rains : जिल्ह्यात रिमझिम पाऊस कोसळत असून सर्वत्र ढगाळ हवामान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिमझिम पाऊस कोसळत असून सर्वत्र ढगाळ हवामान आहे. मध्येच जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरी 1786.5 मि.मी. पाऊस झाला आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 106.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 382.499 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 85.50 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 7 हजार 769.506 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तिलारी नदीत सुरू आहे.

Nanded Rain News : जिल्ह्यात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा दमदार सुरुवात 
Nanded Rain News : तब्बल दहा दिवस जिल्हाभरात धोधो कोसळून रस्ते, वाहतूक,गाव- शहरे,शेती,पीक, जमीन याठिकाणी पाणीच पाणी करून,सगळ्यांची दाणादाण उडवल्यानंतर वरूण राजाने जिल्ह्यात दिवस विश्रांती घेतली होती. ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील राहिलेली कामे उरकण्यास सवड मिळाली होती.दरम्यान तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल सायंकाळ पासून पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावलीय,तर संध्याकाळ पासून सुरू झालेली पावसाची रिपरिप सकाळ पर्यंत सुरूच आहे. ज्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाली असून सखल भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे वरुण राजा पुन्हा सर्वांची दाणादाण उडवायला सज्ज झालाय असंच म्हणाव लागेल.

 
 सौंदड-राका मार्गावर कोल्हापूरची बंधा-याला कठडे नसल्याने बैलबंडी गेली नाल्यात वाहून
Gondia News Rains: गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड-राका मार्गावर कोल्हापूरी बंधा-याला कठडे नसल्याने कोल्हापुरी बंधा-यावरून  बैलबंडी नदी पात्रात पडल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये बैलबंडी चालक जखमी झाला आहे. तर एक बैल बंधा-याच्या पाणी वाहत जाणा-या जागेतून दुसरीकडे वाहून निघाला तर एक बैल बैलबंडीलाच लटकून राहीला. नशीब बलवत्तर म्हणून  बैलगाडीचालक आणि दोन्ही बैल बचावले आहे.त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पाऊस 





हिंगोली जिल्ह्यात एक दिवसाच्या विश्रांतीनंतर रात्री जोरदार पाऊस झालाय. मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली.यंदा एवढ्या मोठा प्रमाणात पाऊस बरसलाय .  जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 477  मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ओंढा वसमत सेनगाव या भागामध्ये जोरदार पाऊस बरसलाय. सकाळी पासून सुद्धा पावसाची रिपरिप सुरूच आहे. पडत असलेल्या  पावसामुळे काही ठिकाणच्या पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. मागील दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने शेतीच्या कामांमध्ये झाला होता .परंतु आज पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत


 

 



 


Aurangabad: जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 72 टक्क्यांवर

Aurangabad News: देशातील सर्वात मोठं मातीचं धरण समजल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा 72.61 टक्के झाला आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी हा पाणीसाठा 35.48 टक्क्यांवर होता. धरणात अजूनही 45 हजार 892 क्युसेकने आवक सुरूच आहे. धरणात सद्या पाण्याचा जिवंतसाठा 1576.258 दलघमी आहे.

Nandurbar Rains:  पावसाने उसंत दिल्याने आंतरमशागतीच्या कामांना वेग 
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने उसंत घेतल्याने आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात यावर्षी कापसाची लागवड झाली असून दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापूस लागवडीचा टप्पा पार झाला असून लागवड केलेल्या कापसाच्या पिकात आंतर मशागतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. कापसाच्या शेतात सततच्या पावसामुळे तन वाढले असल्याने निंदणीच्या कामाला सुरुवात झाली तर दुसरीकडे इतर पिकांच्या कोळपणी तसेच आंतरमशागतीच्या आणि पिकांना खत देण्याची लगबग शेत शिवारात दिसून येत आहे. तर दुसरीकडे ज्या भागात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या भागातील शेतकऱ्यांना आजूनही पंचनाम्याची प्रतीक्षा आहे अशी विरोधाभासी स्थिती जिल्ह्यातल्या अनेक भागात दिसून येत आहेत पावसाने उसंत घेतल्याने बळीराजा शेतीचे काम लवकर पूर्ण करण्याच्या मागे आहे तर दुसरीकडे मजूर टंचाईचा ही फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहण्यास मिळत आहेत.

 
Washim Rains : वाशिम जिल्ह्यात काल रात्रीपासून हलक्या मध्यम  स्वरूपाचा पाऊस  सुरू, आज दिवसभर पाऊस सुरू राहण्याची शक्यता

Washim Rains : वाशिम जिल्ह्यात काल रात्रीपासून हलक्या मध्यम  स्वरूपाचा पाऊस  सुरू, आज दिवसभर पाऊस सुरू राहण्याची शक्यता

Amravati Rains Update : अमरावती शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात रात्रभरापासून संततधार पाऊस

Amravati Rains Update : अमरावती शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात रात्रभरापासून संततधार पाऊस सुरु. जिल्ह्यात कुठं रिमझिम तर कुठं संततधार पाऊस सुरू... अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 13 दरवाजे 150 सेमी ने उघडले तर अचलपूर तालुक्यातील वझ्झर धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले...

Parbhani Rain News :  परभणी : 3 दिवसानंतर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन, सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात 

Parbhani Rain News :  परभणी : 3 दिवसानंतर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन, सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात , परभणीसह अनेक तालुक्यात पाउस

Buldhana Rain News:  बुलढाण्यात पावसाचा कहर , जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस

Buldhana Rain News:  बुलढाण्यात पावसाचा कहर , जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस, शेगाव तालुक्यातील कालखेड गावाला पुराचा वेढा. रात्री 2 वाजेपासून गावातील काही घरात पाणी. शेगाव - संग्रामपूर - बुऱ्हाणपूर मार्ग बंद , कालखेड नाल्याचा पूल पाण्याखाली.


रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन अडकली , कालखेड येथील पुरामुळे रुग्णाचे हाल

गडचिरोली जिल्ह्यातील तेलंगणाच्या टोकावरील सिरोंचा येथे भयावह स्थिती

गडचिरोली जिल्ह्यात पाऊस थांबला आहे. मात्र विदर्भातील ताज्या पूरपरिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील तेलंगणाच्या टोकावरील सिरोंचा येथे भयावह स्थिती आहे. गेले चार दिवस हे तालुक्याचे शहर चारही बाजूने पाण्याने वेढले आहे. मेडीगट्टा महाबंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने सिरोंचा येथे बॅकवॉटरची स्थिती आहे. तर दुसरीकडे वैनगंगा- प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांच्या संगमस्थळी पाण्याची आवक सुरूच असल्याने या गावाला पुराचा वेढा पडला आहे.  1986साली अशाच पद्धतीने विनाशकारी महापूर आला होता. गडचिरोली जिल्ह्यातील 40 गावातील नागरिकांचे ताज्या पुरात स्थलांतर करण्यात आले आहे त्यातील तब्बल 34 गावे सिरोंचा तालुक्यातील आहेत. सिरोंचा येथील स्थानिक प्रशासन पूरग्रस्त नागरिक आणि पडझड झालेल्या घरातील सावरत असलेल्या पूरग्रस्तांना आधार देण्यात गुंतले आहे. गोसेखुर्द धरणातील आवक वैनगंगा नदीत अधिक  प्रवाहित झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही मार्ग पुन्हा एकदा बंद झालेत.

राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी 9 तुकड्या

मुंबई -३, पुणे-२ अशा एकूण ५ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे-२, नागपूर-२ अशा एकूण ४ टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या  आहेत.  राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज  सकाळी ११ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिध्दीसाठी देण्यात  येत आहे.
 

राज्यात राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 15 तुकड्या तैनात

मुंबई (कांजूरमार्ग १, घाटकोपर १) -२, पालघर-१, रायगड-महाड-१,  ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१, सिंधुदुर्ग-१, गडचिरोली -१ अशा  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली -१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ)  च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राज्यातील नुकसानीची सद्य:स्थिती

राज्यात 73 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून आतापर्यंत 11 हजार 836 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आतापर्यंत अति वृष्टीमुळे 104 नगरिकांनी  आपला जीव गमावला आहे तर 189 प्राणी दगावले आहेत.


 

परशुराम घाटात एकेरी वाहतूक

कोंकण विभागात -रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात २०.१ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही, मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळी वरून वाहत आहेत. वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा  ३० जुलै २०२२ पर्यंत सकाळी ६ वा. पासून ते सायंकाळी ७. वा. पर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली असून, सायंकाळी ७. वा. ते सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच राजापूर कोल्हापूर यांना जोडणारा अनुस्कुरा घाटातील दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.


 

गडचिरोलीत सिरोंचामध्ये चार दिवसांपासून पूरस्थिती कायम

गडचिरोलीत सिरोंचामध्ये चार दिवसांपासून पूरस्थिती कायम आहे. चार दिवस  सिरोंचाला चारही बाजूने पाण्याने वेढलंय.. मेडीगट्टा बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानं सिरोंचा जलमय झालंय.. वैनगंगा, प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांच्या संगमस्थळी पाण्याची आवक सुरूच असल्याने या गावाला पुराचा वेढा कायम आहे


नागपूर विभागात-गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 20 मिमी. एवढा सरासरी पाऊस झाला असून जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत तर गोदावरी नदी व इंद्रावती नदी या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. या नद्या तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित झाले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या १० हजार ६०६ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी ३५ मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत.

Maharashtra Rain :  राज्यात सततच्या पावसाचं धुमशान सुरुच

Maharashtra Rain :  राज्यात सततच्या पावसाचं धुमशान सुरुच आहे. आतापर्यंत पावसामुळं राज्यातील विविध भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तर 104 लोकांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे. गडचिरोलीत परिस्थिती भयंकर असून  गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Rain :  राज्यात सततच्या पावसाचं धुमशान सुरुच आहे. आतापर्यंत पावसामुळं राज्यातील विविध भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तर 104 लोकांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे. गडचिरोलीत परिस्थिती भयंकर असून  गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


गडचिरोलीत सिरोंचामध्ये चार दिवसांपासून पूरस्थिती कायम आहे. चार दिवस  सिरोंचाला चारही बाजूने पाण्याने वेढलंय.. मेडीगट्टा बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानं सिरोंचा जलमय झालंय.. वैनगंगा, प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांच्या संगमस्थळी पाण्याची आवक सुरूच असल्याने या गावाला पुराचा वेढा कायम आहे


नागपूर विभागात-गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 20 मिमी. एवढा सरासरी पाऊस झाला असून जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत तर गोदावरी नदी व इंद्रावती नदी या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. या नद्या तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित झाले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या १० हजार ६०६ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी ३५ मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत.


कालेश्वरम सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी महत्तम पूर पातळीवरून वाहत आहे. लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे ८५ पैकी ८५ गेट उघडलेले आहेत.  गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


परशुराम घाटात एकेरी वाहतूक


 कोंकण विभागात -रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात २०.१ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही, मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळी वरून वाहत आहेत. वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा  ३० जुलै २०२२ पर्यंत सकाळी ६ वा. पासून ते सायंकाळी ७. वा. पर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली असून, सायंकाळी ७. वा. ते सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच राजापूर कोल्हापूर यांना जोडणारा अनुस्कुरा घाटातील दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.


राज्यातील नुकसानीची सद्य:स्थिती


 राज्यात 73 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून आतापर्यंत 11 हजार 836 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आतापर्यंत अति वृष्टीमुळे 104 नगरिकांनी  आपला जीव गमावला आहे तर 189 प्राणी दगावले आहेत.


राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 15 तुकड्या तैनात


मुंबई (कांजूरमार्ग १, घाटकोपर १) -२, पालघर-१, रायगड-महाड-१,  ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१, सिंधुदुर्ग-१, गडचिरोली -१ अशा  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली -१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ)  च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.


राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी 9 तुकड्या


मुंबई -३, पुणे-२ अशा एकूण ५ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे-२, नागपूर-२ अशा एकूण ४ टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या  आहेत.  राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज  सकाळी ११ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिध्दीसाठी देण्यात  येत आहे.
 
गडचिरोली जिल्ह्यात पाऊस थांबला आहे. मात्र विदर्भातील ताज्या पूरपरिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील तेलंगणाच्या टोकावरील सिरोंचा येथे भयावह स्थिती आहे. गेले चार दिवस हे तालुक्याचे शहर चारही बाजूने पाण्याने वेढले आहे. मेडीगट्टा महाबंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने सिरोंचा येथे बॅकवॉटरची स्थिती आहे. तर दुसरीकडे वैनगंगा- प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांच्या संगमस्थळी पाण्याची आवक सुरूच असल्याने या गावाला पुराचा वेढा पडला आहे.  1986साली अशाच पद्धतीने विनाशकारी महापूर आला होता. गडचिरोली जिल्ह्यातील 40 गावातील नागरिकांचे ताज्या पुरात स्थलांतर करण्यात आले आहे त्यातील तब्बल 34 गावे सिरोंचा तालुक्यातील आहेत. सिरोंचा येथील स्थानिक प्रशासन पूरग्रस्त नागरिक आणि पडझड झालेल्या घरातील सावरत असलेल्या पूरग्रस्तांना आधार देण्यात गुंतले आहे. गोसेखुर्द धरणातील आवक वैनगंगा नदीत अधिक  प्रवाहित झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही मार्ग पुन्हा एकदा बंद झालेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.