Maharashtra Rain : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या बहुतांश भागात पावसानं उघडीप दिली आहे. तसेच ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती, त्याठिकाणी जनजीवन पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, मंबई (Mumbai) आणि परिसरात काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. आजही मुंबईसह परिसर आणि पुणे, सातारा, नाशिक तसेच कोकणात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


दरम्यान, आत्तापर्यंत राज्यात चांगला पाऊस झाला आहे. जूनमध्ये पावसानं दडी मारली होती. मात्र, त्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं विदर्भासह मराठवड्यात पूरस्थिती उद्भवली होती. या पुरामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. नदी नाल्यांना पूर आल्यामुळं वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तसेच शेती पिकांचेही मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान, जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळं विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदियात पूरस्थिती निर्माण झाली होती. पण पावसाचा जोर कमी झाल्यानं स्थिती पूर्वपदावर येत आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. तर काही भागात पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्यातच आता पुणे सातारा नाशिक येथील घाट परिसरात मेघ गर्जनेसह ढग तयार झाले आहेत. त्यामुळे तिथे पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


सराररीपेक्षा महाराष्ट्रात अधिक पाऊस


जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. त्यानंतर जुलै आणि चालू ऑगस्ट महिन्यात मात्र, राज्यातील सर्वच भागात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. जूनपासून आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण बघितले तर राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 1 जूनपासून राज्यात सरासरीपेक्षा 27 टक्के अधिक पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. शेती पिकांचे देखील या पावसामुळं नुकसान झालं होतं. ओडिशावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रालाही पावसानं झोडपून काढलं आहे. राज्यातील 24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 1 जूनपासून राज्यात सर्वच जिल्ह्यात पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे.  पावसाळ्याच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 जूनपासून राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के अधिक पाऊस झाल्याचं हवामान खात्यानं सांगितले आहे. राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याचे दिसत आहे.