Maharashtra Rain : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार परतीचा पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane), रायगड या भागात पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस म्हणजे 13 ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
14 ऑक्टोबरपासून पावसाचा जोर कमी होणार
केरळ किनारपट्टीवरील कमी दाब क्षेत्र सध्या लक्षद्विप वरून अरबी समुद्राच्या मध्यावर पोहोचत आहे. परिणामी आजपासून भाग बदलत राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. 14 ऑक्टोबरपासून काही दिवसासाठी काहीशी उघडीप जाणवेल. शेतपिके व फळबागांना या पावसापासून कदाचित काहीसा अपाय होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. परंतु ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या आवर्तनातील पावसापासून म्हणजे मंगळवार 22 ऑक्टोबरनंतर होणाऱ्या पावसाचा कोकणातील शेतपिके व फळबागांना फायदाच होईल असे वाटत असल्याचे खुळे म्हणाले.
13 ऑक्टोबर पर्यन्त महाराष्ट्राबरोबर मुंबईसह कोकणातही पावसाची शक्यता
दिड किमी उंचीवर महाराष्ट्राच्या भुभागावर ताशी 28 तर मुंबईसह कोकण किनारपट्टीवर ताशी 37 किमी वेगाने पूर्वेकडून ह्या अरबी समुद्रातील हवेच्या तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे वारे वाहत आहे. दोन्हीही समुद्रातून होणाऱ्या बाष्प पुरवठ्यामुळे रविवार 13 ऑक्टोबर पर्यन्त महाराष्ट्राबरोबर मुंबईसह कोकणातही हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, परतीचा पाऊस अजुन नंदुरबार पर्यंतच जागेवर खिळलेला असल्याचे खुळे म्हणाले.
मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली, पश्चिम उपनगर, कुर्ला या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस
मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली, पश्चिम उपनगर, कुर्ला या भागात विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, अचानक आलेल्या या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तसेच या पावसामुळं सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह मुंबई पूर्व उपनगरे, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पुढील 120 मिनिटांपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. याचा मुंबईतील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. संथ गतीनं वाहतूक सुरु आहे. त्यामुळं नागरिकांना त्रा सहन करावा लागतोय.
महत्वाच्या बातम्या: