Maharashtra Rain LIVE Updates : रत्नागिरीत 13 ते 17 सप्टेंबर दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Rain LIVE Updates : राज्यभरात पावसाच्या कोसळधारेचा इशारा. अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं हवामान विभागाचं आवाहन.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Sep 2022 05:58 PM
Ratnagiri Rain : रत्नागिरीत 13 ते 17 सप्टेंबर दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

 रत्नागिरीत जिल्ह्यात 13 ते  17 सप्टेंबर  या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितेता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केली आहे.

नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस, पिकांना फायदा

नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह पावसाने हजरी लावलीय. या पावसामुळे कापूस पिकासह अनेक पिकांना याचा फायदा होणार आहे.  

Ratnagiri Rain : संगमेश्वरमधील गड नदीला पूर, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

Ratnagiri Rain :  रत्नागिरीतील  संगमेश्वर येथे सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे संगमेश्वरमधील गड नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी माखजन बाजारपेठेत शिरण्यास सुरवात झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे पुराची तीव्रता वाढण्याची भीती आहे. गड नदी लगत असलेली अनेक हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे 

Kolhapur : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान; कोल्हापूर जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाचा जोर

Kolhapur : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा प्रचंड नुकसान केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत असून सोयाबीन, भुईमूग, मुग या पिकाला या पावसाचा फटका बसला आहे. सोयाबीन काढणीला आले असताना शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे. आधी बोगस बियाण्यांमुळे सोयाबीनचे पीक घेता आले नाही. तर आता हाता-तोंडाला आलेले पीक परतीच्या पावसाने जमीनदोस्त केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या नुकसानीचे तत्काळ पंचनामे होऊन मदत मिळावी अशी मागणी केली आहे.

Kolhapur : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान; कोल्हापूर जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाचा जोर

Kolhapur : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा प्रचंड नुकसान केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत असून सोयाबीन, भुईमूग, मुग या पिकाला या पावसाचा फटका बसला आहे. सोयाबीन काढणीला आले असताना शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे. आधी बोगस बियाण्यांमुळे सोयाबीनचे पीक घेता आले नाही. तर आता हाता-तोंडाला आलेले पीक परतीच्या पावसाने जमीनदोस्त केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या नुकसानीचे तत्काळ पंचनामे होऊन मदत मिळावी अशी मागणी केली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर, कोल्हापुरातील एकूण 50 बंधारे पाण्याखाली

Kolhapur News : यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी ही तिसऱ्यांदा पात्रा बाहेर पडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 50 बंधारे पाण्याखाली गेले असून जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. पंचगंगा नदी सध्या तीस फुटांवरुन वाहत असून नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर राधानगरी धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे उघडले असून त्यामधून देखील भोगावती नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.

अकोल्यात मोहाळी नदीच्या पुरात वाहून गेल्याने आजोबा-नातवाचा मृत्यू

Akola News : अकोला जिल्ह्यात नदीच्या पाण्यात वाहून गेल्याने आजोबा-नातवाचा मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील तांदूळवाडी येथील ही घटना आहे. गावातील मोहाळी नदीला आलेल्या पुरात हे दोघेही वाहून गेले. प्रभाकर लावणे आणि आदित्य लावणे अशी मृतांची नावं आहेत. आज सकाळी साडेआठ वाजता ही घटना आहे. यातील आजोबांचा मृतदेह सापडला आहे तर नातवाचा शोध सुरु आहे. 

मुसळधार पावसामुळे पालेभाज्यांना फटका, पावसामुळे आवक घटल्याने आणि पालेभाज्या खराब होत असल्याने दरात घसरण 
मुसळधार पावसामुळे पालेभाज्यांना फटका, पावसामुळे आवक घटल्याने आणि पालेभाज्या खराब होत असल्याने दरात घसरण 

 

पालक 10 रुपये जुडी, पावसापूर्वी 20 रुपयांना एक जुडी होती तर कोथिंबीरीचा भाव आज 40 रुपये जुडी, काल कोथिंबीरीचा भाव 60 रुपये जुडी होता 

 

दुसरीकडे, भेंडी, गवारसारख्या भाज्यांच्या दरात देखील घसरण, 80 रुपये प्रति किलो असलेले दर 60 रुपये किलोंवर

 

टोमॅटोच्या दरात देखील वाढ, टोमॅटो 40 रुपये प्रति किलोवर, दोन दिवसांपूर्वी टोमॅटो 24 रुपये किलो 

 

आल्याचे भाव वधारले, आले 100 रुपये किलो, 4-5 दिवसांपूर्वी आले 60 रुपये किलो
Mumbai Local Updates : मध्ये रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिट उशिरानं, दोन्ही मार्गावर लोकल गाड्या उशिरानं

Raigad Rain Updates : रायगड जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या सरी

Raigad Rain Updates : रायगड जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या सरी


 कोलाड, माणगाव, रोहा, पेण भागात पावसाच्या सरी


 अलिबाग, मुरुड, उरण या किनारपट्टीच्या भागात पावसाच्या हलक्या सरी


आज दिवसभर रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी

Thane Rain Updates : ठाण्याच्या तलावपाळी भागात सखल भागांत पाणी, चारी बाजूंनी वाहतूक कोंडी

Thane Rain Updates : ठाण्याच्या तलाव पाली भागात सखल भागात पाणी साचल्याने चारी बाजूंनी वाहतूक कोंडी

Beed Rain Updates : कमी पाऊस असून देखील उपसा सिंचन योजनेमुळे अष्टीचं मेहकरी धरण पूर्ण क्षमतेने भरलं

Beed Rain Updates : आष्टी तालुक्यात यावर्षी कमी पाऊस असून देखील मेहकरी धरण हे पूर्ण क्षमतेने भरल्याने 30 गावांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या सीना धरणातून मेहकरी धरणात उपसा सिंचनाद्वारे पाणी सोडण्यात येतं आणि यावर्षी कमी पाऊस झाल्याने शिना धरणातून मेहकरी धरणात पाणी सोडण्याची विनंती आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी केली होती.


बीड जिल्ह्यात यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने अनेक धरणांमध्ये अद्यापही पुरेसा पाणी साठा झालेला नाही त्यातच आष्टीच्या मेहकरी धरणामध्ये पूर्ण क्षमतेने पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचा वातावरण पाहायला मिळतंय.

Maharashtra Rain Updates : कोणत्या भागात ऑरेंज आणि यलो अलर्ट?

Maharashtra Rain Updates : हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासाठी पुढील पाच दिवस पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसाठी आजपासून पुढील तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात पुढील तीन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पुढील दोन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नांदेड आणि हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं आज मराठावाड्यासाठी देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Wardha Rain News : वर्ध्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार

Wardha Rain News : वर्धा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. ग्रामीण भागांतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावाला पाण्याचा वेढा आहे. 2 ते 3 फूट पुराच्या पाण्यातून नागरिकांना महत्वाच्या कामासाठी वाट काढावी लागत आहे. तर वर्धमनेरी-आर्वी मार्ग बंद झाला आहे. तसेच चानकी-भगवा मार्ग बंद झाला आहे. अनेक शेतात पुन्हा पाणी साचल्याच पाहायला मिळत आहे. 

Buldana Rain Updates : बुलढाण्यात पावसाची संततधार

Buldana Rain Updates : बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 36 तासांपासून अनेक भागांत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झालं असून नदी नाले दुधडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी शेतात पाणी तुंबल्यामुळे शेतकऱ्यांची पिकं ही पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. 

Shirdi Rain Updates : शिर्डीत मुसळधार पाऊस

Shirdi Rain Updates : शिर्डीसह परिसरात मुसळधार पाऊस बरसत आहे. काल संध्याकाळपासून शिर्डीत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. राहता, कोपरगाव, शिर्डी, बाभलेश्वर परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. 

Maharashtra Rain Updates : महाराष्ट्रातही पावसाचा तडाखा

Maharashtra Rain Updates : हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, दक्षिण ओदिशाच्या किनारपट्टीभागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात विजांच्या कडकडाटासह तीन दिवस मुसळधार पाऊस तर मराठवाडा भागात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुण्यात रविवारीच सलग तीन-चार तास पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांचे हाल झाले. सोमवारीही अनेक शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली. 

Maharashtra Rain Updates : राज्यभरातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस

Heavy Rain Forecast For These States : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं (Maharashtra Rain Updates) पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी उकाड्यानं अंगाची लाही लाही होत होती. अशातच पुन्हा एकदा वरुणराजानं कृपा करत बरसण्यास सुरुवात केल्यानं अनेक राज्यांत उकाड्यापासून सुटका झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


भारतीय हवामान खात्यानं गुजरात (Gujrat), महाराष्ट्र (Maharashtra), पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं की, या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेच्या सुमारास बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओदिशामध्ये अत्यंत मुसळधार पाऊस कोसळू शकतो. त्यासह इतर राज्यांतही हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Mumbai Rain Updates : मच्छिमारांना पुढील 2 दिवस अरबी समुद्रात न जाण्याचा इशारा

Maharashtra Mumbai Rain Updates : मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षता घेता राज्यातील मच्छिमारांना पुढचे काही दिवस मासेमारी करण्यासाठी समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान विभागानं दिल्या आहेत. त्याचप्रमाणे पुढील 4 ते 5 दिवसांत पावसाचा जोर वाढणार असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन भारतीय हवामान विभागानं केलं आहे. 

Maharashtra Rain Updates : पुढील काही दिवस विदर्भ, कोकणात मुसळधार पाऊस

Maharashtra Rain Updates : दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टी भागांत कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात विजांच्या कडकडाटासह तीन दिवस मुसळधार पाऊस तर मराठवाड्याती काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. हवामान विभागाकडून पुढचे काही दिवस सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

Mumbai Rain Updates : मुंबईत पहाटेपासून पावसाची कोसळधार

Maharashtra Mumbai Rain Updates : मागील काही तासांमध्ये मुंबई (Mumbai) , कोकण (Konkan) तसेच, राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार (IMD) येणारे 4 ते 5 दिवस राज्यातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 


मुंबईत गेल्या एक तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काल (सोमवारी) दिवसभर मुंबईत पावसाच्या रिमझीम सरी कोसळत होत्या. तसेच, मध्यरात्रीही पावसाची उघडझीप सुरु होती. अशातच गेल्या तासाभरापासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पहाटे पाच वाजल्यापासून संपूर्ण मुंबई शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात वांद्रे, सांताक्रुज, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त आहे. पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळं अंधेरी सबवेमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. काही गाड्या सबवेमध्ये अडकल्या असून काही गाड्या साचलेल्या पाण्यामुळे बंद पडल्या आहेत. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra Rain LIVE Updates : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी उकाड्यानं अंगाची लाही लाही होत होती. अशातच पुन्हा एकदा वरुणराजानं कृपा करत बरसण्यास सुरुवात केल्यानं अनेक राज्यांत उकाड्यापासून सुटका झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


भारतीय हवामान खात्यानं गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं की, या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेच्या सुमारास बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओडिशामध्ये अत्यंत मुसळधार पाऊस कोसळू शकतो. त्यासह इतर राज्यांतही हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे. 


महाराष्ट्रातही पावसाचा तडाखा 


हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीभागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात विजांच्या कडकडाटासह तीन दिवस मुसळधार पाऊस तर मराठवाडा भागात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुण्यात रविवारीच सलग तीन-चार तास पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांचे हाल झाले. सोमवारीही अनेक शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली. 


शिर्डीत मुसळधार पाऊस 


शिर्डीसह परिसरात मुसळधार पाऊस बरसत आहे. काल संध्याकाळपासून शिर्डीत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. राहता, कोपरगाव, शिर्डी, बाभलेश्वर परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. 


बुलढाण्यात पावसाची संततधार 


बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 36 तासांपासून अनेक भागांत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झालं असून नदी नाले दुधडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी शेतात पाणी तुंबल्यामुळे शेतकऱ्यांची पिकं ही पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. 


वर्ध्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार 


वर्धा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. ग्रामीण भागांतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावाला पाण्याचा वेढा आहे. 2 ते 3 फूट पुराच्या पाण्यातून नागरिकांना महत्वाच्या कामासाठी वाट काढावी लागत आहे. तर वर्धमनेरी-आर्वी मार्ग बंद झाला आहे. तसेच चानकी-भगवा मार्ग बंद झाला आहे. अनेक शेतात पुन्हा पाणी साचल्याच पाहायला मिळत आहे. 


कोणत्या भागात ऑरेंज आणि यलो अलर्ट?


हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासाठी पुढील पाच दिवस पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसाठी आजपासून पुढील तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात पुढील तीन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पुढील दोन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नांदेड आणि हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं आज मराठावाड्यासाठी देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.