Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, अकोल्यात जनजीवन विस्कळीत

Maharashtra Rain Live : राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पडत आहे

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 18 Sep 2022 09:38 AM

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates : हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे.  मुंबईसह ठाणे परिसरात पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी रात्री...More

वसई विरारमध्ये जोरदार पाऊस

Vasai Virar Rain : वसई विरारमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. नालासोपारातील पूर्व आचोळे रोड, सेंट्रल पार्क, विवा कॉलेज रस्ता या ठिकाणी सकल भागात काही प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पाऊस जर दिवसभर असाच राहिला तर शहरातील अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. सततच्या पडणाऱ्या पावसाने परिसरात सध्या तरी कुठेही आपत्तीजनक घटना घडल्या नाहीत. विरारहून चर्चगेट जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल सुरळीत चालू आहेत.