Maharashtra rain : गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात  चांगला पाऊस (Rain) झाला आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नदी नाले धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालीय. दरम्यान, सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी वादळी वारा देखील येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. जाणून घेऊयात हवामान विभागाचा अंदाज.


आज कुठं-कुठं पडणार पाऊस?


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं या भागातील लोकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन हवामान विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


आजपासून पुन्हा राज्यात पावसाचा जोरद वाढणार


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्टनंतर म्हणजे आजपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. 22 ऑगस्टपर्यंत हळूहळू पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ महिना अखेरपर्यंत चालू राहील अशी माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 29 टक्के पाऊस अधिक झाल्यानं शेतकरी समाधानी झाले आहेत. तर जादा पावसामुळे काही ठिकाणी शेतकरी अडचणीत देखील आले आहेत.


महत्वाच्या बातम्या:


Pune Rain: पुण्यासह घाटमाथ्यावर पावसाची शक्यता; या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, राज्यातील अतर भागात उघडीप