Pune Rain: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा (Heavy Rain) जोर काहीसा ओसरला असल्याचे दिसून येत आहे. तर राज्यातील काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आज (रविवारी) राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट (Yello alert) जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यामध्ये पावसाने घेतलेली विश्रांती कायम राहिल, असा अंदाज हवामान खात्याने (IMD) दिला आहे. तर उद्यापासून (सोमवारी) तीन दिवस राज्यात पावसाची (Heavy Rain) उघडीप असणार आहे. तर पुणे शहर परिसरातील पाऊस काहीसा ओसरला असला तरी आज तुरळक ठिकाणी पावसाची (Rain Update) शक्यता आहे.
पुढील तीन-चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. पुणे (Pune Rain) व रायगडसह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. कोकणातील पालघर, रायगड, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा (Heavy Rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे.
त्याचबरोबर धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता (Heavy Rain) हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
आज या जिल्ह्यांना यलो अलर्ट
आज (रविवारी) रायगड, पुणे, भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट' हवामान विभागाने दिला आहे, तर उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. पुणे परिसरात येत्या 48 तासांमध्ये आकाश ढगाळ राहून मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे तर विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.
तळकोकणातील काही भागात पावसाचा जोर कायम
तळकोकणातील काही भागात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडीत पावसाचा (Heavy Rain) जोर कायम आहे. समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.