Maharashtra Rain : राज्यात बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. त्यामुळं शेती  पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळं पूरस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणच्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अशातच, आजपासून चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना खरबदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. 


राज्यात झालेल्या पावसामुळं शेतकरी आनंदी आहेत. तर काही ठिकाणी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसानही झालं आहे. तर काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, मागील दोन दिवसापासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी पूरस्थिती होती, त्या ठिकाणच्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पावासाचा जोर कमी झाल्यामुळं शेतीच्या कामांना वेग आला आहे.


दरम्यान, आजपासून चार दिवस मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात मुंबईसह कोकण, नाशिक आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.  मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत रविवार आणि सोमवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धुवाधार पावसानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे. मोजक्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. तर उर्वरित ठिकाणी पावसानं उघडीप घेतली होती. मात्र, अशातच आता हवामान विभागानं आजपासून मुसळदार पावासाचा इशारा दिला आहे. त्यामुळं राज्यात उघडीप दिलेला पाऊस पुन्हा एकदा हजेरी लावणार आहे. 


यवतमाळ 


यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळं हाहा:कार सुरु आहे. यवतमाळमधील जवळपास 37  गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील झोला या संपूर्ण गावालाच पुरानं वेढा दिला आहे. त्यामुळं या गावातील सर्वच लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. तर पुराचा फटका बसलेल्या यवतमाळमधील जवळपास साडेतीन हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थरांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पुराने अक्षरश: नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. 


वणी तालुक्यातील भुरकी, जुनाड, कवडशी, सावनगी, शिवणी, चिंचोली,  जुगाद, सेलू, झोला रांगणा, कोना, पिंपळगाव, नायगाव, उकणी , शेलू, कवडशी, शिवणी,  चिंचोली या गावांना पुराचा वेढा बसला होता. लोकांना बोटी द्वारे बाहेर काढण्यात आले. शिवणी आणि चिंचोली  गावातील नागरिकांची कैलासनागर येथील सांस्कृतिक हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. दोन दिवस जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या भागात दौरा करून ड्रोनच्या माध्यमातून प्रत्येक बाबीचा आढावा घेतला.